सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणीचा विनयभंग, काँग्रेसच्या NSUI प्रदेश सचिवावर गुन्हा दाखल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुणे काँग्रेस NSUI चे प्रदेशसचिव अक्षय कांबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले विद्यपीठात अनेक मुलींचा मानसिक छळ करणं आणि त्रास दिला म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने व्हिडिओ शूट करून आपल्यावर झालेल्या अन्ययाबाबत माहित दिली आहे. तसंच आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पोलिसांना करण्यात आली आहे.चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय कांबळे (वय २८, ३० अंदाजे, पुणे काँग्रेस NSUI प्रदेश सचिव) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कांबळे हा गेले तीन महिन्यापासून तरुणीला त्रास देत होता. तो बोलताना अश्लील भाषेचा वापर करत होता. त्यानुसार त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News : तरुण क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला, गोलंदाजी करताना अनर्थ; आयुष्याच्या खेळाचा सामना क्षणात हरला

पीडित तरुणीने व्हिडिओमध्ये काय म्हटलंय?

मी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थीनी बोलत आहे. गेले तीन महिने NSUI चा अध्यक्ष हा मला त्रास देत आहे. टॉर्चर करत आहे. त्याने माझं विद्यापठातील जगणं मुश्किल केलं आहे, मला हॉस्टेलच्या बाहेर यायला सुद्धा भीती वाटत आहे. आज तर हद्दच झाली. NSUI च्या गुंडांनी मला येऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला. माझी पोलिसांना आणि विद्यापीठ प्रशासनांना विनंती आहे, की मला याच्यापासून संरक्षण हवं आहे. याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. अशा प्रकारचा पीडित तरुणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
शूज व्यापाऱ्याच्या घरावर छापा, नोटा मोजता-मोजता अधिकारीही चक्रावले; रात्रभर आयकर विभागाकडून कारवाई
पुणे विद्यापीठ एनएसयूआय अध्यक्ष अक्षय कांबळे हा विद्यार्थी वर्षानुवर्ष विद्यापीठ परिसरामध्ये राहून विद्यार्थिनींशी दुर्व्यवहार करताना आढळला आहे. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये सतत होणारी भांडणं आण मारामारी यांचं मूळ कारण हा काँग्रेसचा पदाधिकारी आहे. या व्यक्तीने आतापर्यंत अनेक विद्यार्थिनींना मेसेज करून त्रास दिला आहे. जी विद्यार्थिनी समोर येऊन बोलण्याचं धाडस करते, तिला चुकीच्या पद्धतीने टॉर्चर करून तिच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

नुकतंच एका विद्यार्थिनीला त्याने केलेल्या मेसेजमुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली असता, पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीला छळ केल्याचे गुन्हे देखील दाखल केले आहेत.