यावेळी माघार, वारंवार नाही; फडणवीसांच्या विनंतीस मान, विधानपरिषद न लढण्याचा राज ठाकरेंचा निर्णय

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीतून अखेर मनसेने बिनशर्त माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. त्यानंतर मनसेने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांना दिली. यावेळी सरदेसाईंसह अविनाश जाधव, अभिजीत पानसे, भाजप नेते प्रसाद लाड उपस्थित होते. त्यामुळे भाजपसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे.

नितीन सरदेसाई यांनी काय सांगितलं?

तीन तारखेला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर पुन्हा त्यांची दोनदा चर्चा झाली. यावेळी फडणवीसांनी वैयक्तिक विनंती केली, की विधानपरिषद निवडणुकीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने डावखरेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अभिजीत पानसेंनी माघार घ्यावी, असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.

फडणवीसांच्या विनंतीला मान देत राज ठाकरेंनी निर्णय घेतला, की अभिजीत पानसे अर्ज भरणार नाहीत. निरंजन डावखरेंनी राज ठाकरेंचा आशीर्वाद घेतला, असंही सरदेसाई म्हणाले.
Devendra Fadnavis : संघाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांशी भेट, फडणवीस दिल्लीला; RSS ची ‘गरज नसणाऱ्या’ नड्डांसाठी संदेश?
दरम्यान, पाठिंब्याबद्दल राज ठाकरे यांनी निक्षून सांगितलं की, अशी गोष्ट वारंवार होणार नाही. कारण आमचाही स्वतंत्र पक्ष आहे. राजकारणात बऱ्याच गोष्टी घडत असतात, ज्याचा पक्षाला होणारा फायदा कालांतराने दिसतो. निवडणुकीची तयारी खूप चांगली झाली होती. मात्र फडणवीसांच्या विनंतीला मान देत माघारीचा निर्णय घेतला. पक्षाला याचा फायदा नजीकच्या काळात दिसेल, असे सरदेसाई म्हणाले.

मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांना उमेदवारी खूप आधीच जाहीर केली होती. त्यानंतर भाजपनेही ठाम भूमिका घेत आपल्या हक्काची जागा आपणच लढवणार असल्याची भूमिका घेतलेली. त्यामुळे लोकसभेला ‘बिनशर्त’ पाठिंबा देणाऱ्या मनसेसोबत भाजपचा सामना रंगणं अटळ मानलं जात होतं.
Krupal Tumane : ४२ जागांची जबाबदारी माझी, तुमानेंना तिकीट द्याल तर ४१, बावनकुळेंनी घातलेली शाहांना अट?Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

खरं तर लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राज ठाकरेंना हिरीरीने सहभागी करुन घेतल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील एका जागेसाठी तरी भाजप मनसेला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती, परंतु भाजपे मनसेलाच माघार घ्यायला लावत त्याला सुरुंग लावला आहे.