मुंबई: गेल्या साडे चार वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी पाहता यंदाची निवडणूक अभूतपूर्व अशी आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात होत आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात दोन प्रादेशिक फुटले. या दोन पक्षांमधील बहुतांश आमदार सत्तेत गेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा रंगतदार निवडणूक होत आहे.
गेल्या साडे चार वर्षांत घडलेल्या घडामोडींमुळे मागील निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले नेते आता खांद्याला खांद्या लावून प्रचार करत आहेत. तर गेल्या निवडणुकीत सोबत दिसलेले नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांना काहीशा विचित्र योगायोगाचा सामना करावा लागत आहे. आजवर ज्यांना विरोध केला, त्यांनाच मतदान करण्याची वेळ काहींवर आली आहे. तर ज्यांना विरोध म्हणून स्वत:चा पक्ष काढला, त्याच पक्षाला मतदान करण्याची वेळ पक्षप्रमुखांवर आली आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलं आहे. ठाकरेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं निवासस्थान याच मतदारसंघात येतं. त्यामुळे यंदा ठाकरे कुटुंब प्रथमच काँग्रेसला मतदान करेल. उमेदवारी जाहीर होताच वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. माझं मत वर्षाताईंनाच, असं यावेळी ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंचे चुलतबंधू आणि मनसेप्रमुख यांचं शीवतार्थ निवासस्थान मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येतं. गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून सेनेचे राहुल शेवाळे रिंगणात आहेत. त्यामुळे राज यांच्यासह त्यांचं कुटुंब यंदा शेवाळेंना मतदान करेल. त्यामुळे राज मनसेच्या स्थापनेनंतर प्रथमच शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचं बटण दाबतील.