प्रेयसीसाठी सायकोथेरपिस्टने कुटुंबाला संपवलं, अपघाताचा बनाव; दीड महिना उत्तम गेला; पण अचानक..

मुंबई : हैदराबादमध्ये अतिशय दुर्देवी आणि क्लेशदायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरने अगदी चित्रपटासारखा बनाव रचत आपल्याच बायको आणि मुलांचा जीव घेतला. कोणीही पाहिले तरी अपघातात कुटुंब गेले असेच वाटेल पण घटना पोलीस तपासात वेगळीच निघाली, डॉक्टर असलेल्या प्रवीणचे रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स सोनी फ्रान्सिस सोबत बराच काळ अनैतिक संबंध होते. प्रेमाच्या संबंधात कुटुंब आडवे येते म्हणून सायकोथेरपिस्ट डॉक्टरने कुटुंबालाच संपवले.

घटनेच्या ४५ दिवसानंतर प्रवीणला बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले. हैदराबाद स्थित असणारा प्रवीण २८ मे च्या दिवशी कुटुंबाला घेवून मूळगावी जाण्यासाठी चारचाकीने निघाला होता. वाटेत त्यानी चारचाकी एका झाडावर नेऊन आदळली आणि त्यात पत्नी आणि मुलींचा मृत्यू झाला असा बनाव रचला. प्रवीणची पत्नी कुमारी हिला साधारण दोन तीन महिन्यापूर्वी प्रवीणच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली होती. दरम्यानच्या काळात याच गोष्टीवरुन दोघांमध्ये भांडण सुरु होती. अशातच प्रवीणच्या डोक्यात कुटुंबाचा काटा काढण्याचा प्लान आला आणि अगदी चित्रपटासारखा त्याने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला.
Crime Story : मेहुण्याच्या प्रेमात पडली तीन मुलांची आई, अनैतिक संबंधासाठी नवऱ्याचा काटा काढला

प्रवीणने पत्नीला गावी जाण्याचा बहाणा करत नेले, पण वाटेत त्याने कुमारीला भूल देणारे इंजेक्शन दिले त्याची मात्रा इतकी वाढवली की कुमारीचा मृत्यू झाला. प्रवीण आणि कुमारी यांना पाच आणि तीन वर्षांच्या दोन मुली होत्या. प्रवीणने दोन्ही मुलींना फ्रंट सीटवर घेतले त्याचे नाक तोंड दाबून दोघींनाही संपवले आणि मग प्रवीणने पुढे जात गाडी एका झाडाला ठोकली, प्रवीण इतक्यावर थांबला नाही त्याने पोलीसांना बोलवले स्वतला सुद्धा दुखापत करुन घेतली. पोलीसांना मृतांना पोस्टमार्टमसाठी पाठवले तर रिपोर्टमध्ये कुमारीच्या अंगावर इजेक्शनचे निशानी आढळून आली तर मुलीचा जीव सुद्धा गुदुमरुन गेल्याची माहिती मिळाली.


पोलीसांनी प्रवीणवर बारीक नजर ठेवली, पत्नी आणि मुलांची अंत्यविधी आटोपल्यानंतर प्रवीण पुन्हा कामाला जावू लागला, मात्र प्रवीण आपल्या घरी न राहता गर्लफ्रेड सोनी हिच्या सोबत राहत असल्याचे पोलीसांना आढळून आले, पोलीसांनी अधिक तपास केल्यावर त्यांना सोनी आणि प्रवीणच्या अनैतिक संबंधाबद्दल सगळी माहिती मिळाली. पुढे पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली, पोलीसांना गाडीतून इजेक्शन मिळाले होते तसेच पोस्टमार्टमच्या रिपोर्टच्या आधारे पोलीसांनी प्रवीणला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली.