पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह! माजी नगरसेवकाच्या मुलाच्या कारची टेम्पोला जोरदार धडक

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला. माजी नगरसेवकाच्या मुलाने कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोचा चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामध्ये माजी नगरसेवकाचा मुलगादेखील जखमी झाला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरव गायकवाडनं हा अपघात केला आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मांजरी मुंढवा रस्त्यावर असणाऱ्या झेड कॉर्नर येथून सौरव गायकवाड हा मंगळवारी पहाटेच्या सुमारस घरी जात असताना समोरून येणाऱ्या कोंबड्याच्या टेम्पोला त्याने जोरात धडक दिली. सौरभ हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी सौरव गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात एवढा भीषण भीषण होता की कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या पुढचा भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. चारचाकीनं जोरात धडक दिल्यानं तिचंही मोठं नुकसान झालं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानं अपघाताचा प्रकार उघडकीस आली आहे. याप्रकरणी अधिक तपास मुंढवा पोलिसांकडून केला जात आहे.

सौरभ गायकवाड याचे वडील बंडू गायकवाड हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असून ते शरद पवार गटामध्ये कार्यरत आहेत. या घटनेमुळे पुण्यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांची मुलं, उद्योगपती, व्यावसायिकांची मुलं असे करताना पाहायला मिळत आहेत.