घोडबंदरची कोंडी सुटणार, गायमुख ते भाईंदरपर्यंत सुस्साट, MMRDA च्या योजनेला मंजुरी; जाणून घ्या कसा असेल मार्ग?

मुंबई : ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं. वाहतूककोंडीसाठी ओळखला जाणारा हा रस्त्या आता अनेकांच्या सोयीचा ठरणार आहे. घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी, यावर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीएच्या नव्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. MMRDA च्या या योजनेत घोडबंदर रोड येथील गायमुखपासून ते भाईंदरपर्यंत १५.५ किमी लांबीचा नवा मार्ग तयार करण्यात येणार आहे. यात १० किलोमीटरचा ऐलिवेटेड रोड आणि ३.५ किमीचा अंडर ग्राऊंड मार्ग अर्थात टनल असणार आहे. हा नवा मार्ग दोन प्रोजेक्टमध्ये विभागण्यात आला आहे.

गायमुख ते भाईंदर – कसा असेल मार्ग?

पहिल्या प्रोजेक्ट अंतर्गत गायमुख ते फाऊंटन हॉटेलदरम्यान ५.५ किमी लांबीचा रस्ता तयार केला जाईल. गायमुख जवळील पर्वत आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे ५.५ किमीच्या मार्गापैकी ३.५ किमीचा मार्ग हा भूमिगत असेल, तर २ किमीचा मार्ग हा सामान्य मार्ग असेल.

तर दुसऱ्या प्रोजेक्ट अंतर्गत फाऊंटन हॉटेल ते भाईंदरदरम्यान १० किमीचा लांबीचा ऐलिवेटेड रोड असेल. ऐलिवेटेड मार्ग सध्याच्या हायवेच्या वर असेल, ज्यात ऐलिवेटेड रोड ४ लेन आणि टनलमध्ये ३ लेन असतील. या दोन्ही प्रोजेक्टला आता मंजुरी मिळाली आहे. या मार्गासाठी जवळपास २० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
Karjat Panvel Train : पनवेल-कर्जत प्रवास आता सुस्साट… प्रवाशांच्या वेळेची बचत होणार, सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण

उपनगरात जाणं होणार सोपं

संपूर्ण घोडबंदर रोड वाहतूकमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए मागील अनेक वर्षांपासून नियोजन करत आहे. त्याआधी ठाण्यातील कोस्टल रोडचा मार्ग तयार करण्यात आला आहे. बाळकुंभ ते गायमुख या मार्गे ठाणे कोस्टल रोड असेल. गायमुख ते भाईंदर या मार्गामुळे, बाळकुंभ ते फाऊंडन हॉटेल आणि पुढे भाईंदरदरम्यान चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होतील. त्याशिवाय घोडबंदर रोडवरुन थेट बोरिवलीला जाण्यासाठी ११.८ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्याचं कामही सुरू होणार आहे.
एका तासाचा प्रवास फक्त २० मिनिटांवर, १८ किमी समुद्रातून ड्रायव्हिंग, मुंबई ते नवी मुंबई सुस्साट सफर

या दोन राज्यात जाण्याचा मार्ग होणार सोपा

फाऊंटन हॉटेल ते भाईंदर या मार्गावर १० किमी लांबीचा ऐलिवेटेड रोड तयार झाल्यास गुजरात आणि राजस्थानहून येणाऱ्या प्रवाशांसाठी हा रोड फायद्याचा ठरणार आहे. शेजारील राज्यातून वाहन चालक फाऊंटन हॉटेल जंक्शनपर्यंत पोहोचतात, पण तेथून पुढे आपल्या घरी पोहोचण्यासाठी ट्रॅफिक लागलं. मात्र १० किमी लांबीचा ऐलिवेटेड रोड बनल्यास वाहनं ट्रॅफिकमध्ये न अडकता प्रवास करता येणार आहे.

हा प्रोजेक्ट महत्वाचा का?

ठाण्यातील घोडबंदर रोडवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या गेल्या आहेत. या इमारतीच्या बांधकामानंतर परिसरात लोकसंख्या वाढल्याने वाहनांची संख्याही मोठ्या वेगात वाढली. परिणामी घोडबंदर रोडवरील वाहतुकीची समस्याही मोठ्या प्रमाणात वाढली. अशात या ट्रॅफिकवर मार्ग काढण्यासाठी सरकारला पर्यायी मार्ग तयार करण गरजेचं ठरलं. त्यामुळेच गायमुखपासून भाईंदरपर्यंतचा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.