कुठे खिडकीतून, तर कुठे कुलूप तोडून; पुण्यात अनेक ठिकाणी घरफोडी; साडे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

प्रतिनिधी, पुणे : शहरात चार ठिकाणी घरफोडी झाली असून, चोरट्यांनी साडेचार लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाषाण येथील चैतन्य क्लासिक या इमारतीतील बंद सदनिकेची कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा २ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी राधाकृष्ण बळवंत कराड (वय ४९, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना १५ ते १६ मेच्या दरम्यान घडली आहे.
कारमध्येच चिमुकलीला विसरले, काही तासांनी लक्षात आलं पण.. आई-वडिलांची एक चूक आणि सारं संपलं
दुसऱ्या घटनेत कोंढव्यातील अजमेरा पार्क हुरेम हाईट्समधील सदनिकेच्या खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्यांनी १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी हुसेन करीम शेख (वय ४३, रा, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना ४ ते १५ मे या दरम्यानच्या काळात घडली आहे.
यात्रेसाठी पाहुण्यांकडे आलेले, नदीवर कपडे धुण्यासाठी गेले आणि नियतीने डाव साधला, चौघांच्या मृत्यूने गावात हळहळ
याशिवाय थेऊरमधील गणेशवाडीतील चिंतामणी पार्क येथे एका सदनिकेमधील बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी ९३ हजारांची रोकड आणि दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अजिनाथ भगवान हजारे (वय ४७, रा. गणेशवाडी, थेऊर) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार घरी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने आत प्रवेश करत लॉकरचा दरवाजा उचकटून ९३ हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे, तसेच मारुती बाबुराव पडळकर यांच्या घरासमोरील दुचाकी चोरून नेली.

दुकानातून इलेक्ट्रिक वायरचे १४ बंडल लंपास

कोंढव्यातील एनआयबीएम परिसरातील न्यू हायस्ट्रीट येथील दुकानाचे कुलूप तोडून तीन अनोळखी महिलांनी ४७ हजार ८८ किमतीचे इलेक्ट्रिक वायरचे १४ बंडल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धर्मेंद्रसिंग राजेसिंग रावत (वय ४४, रा. वडगाव शेरी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.