तेजस यांच्या ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनन हे संशोधन केले. सरड्याची ही प्रजाती हिमालय आणि इंडो-बर्मा प्रदेशात आढळणाऱ्या ‘जपलुरा’ वंशातील आहे.
यापूर्वी, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांच्या पथकाने पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला होता. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मीळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैववैविध्य समोर आले आहे. भारतात पालींच्या वेगवेगळ्या पन्नास प्रजाती आढळतात. त्यात आता गोलाकार मोठ्या बुब्बुळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीररचनेमुळे प्राणितज्ज्ञांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, ईशान अगरवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी शोधलेल्या दुर्मीळ पालीचे नाव ‘मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको’ असे असे ठेवले आहे. हे संशोधन आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या ‘झुटाक्सा’ या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
तेजस ठाकरे यांच्या पथकाने यापूर्वी मेघालयातील जंगलात एका माशाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला होता. ‘चन्ना स्नेक हेड’ असे या दुर्मीळ माशाचे नाव आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ने घेतली होती. या जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाले होते.