आबांचा उल्लेख बॅनरवर नाही; कार्यकर्ते पेटले, एकमेकांना चोपले; काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसभवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, नाना पटोले काँग्रेस भवनमध्ये पोहोचण्यापूर्वी एका बॅनरमुळे मोठा वाद रंगला होता. आबा बागुल यांच्या कार्यकर्त्याला वाटलं की, तो बॅनर आबांच्याच विरोधात झळकला आहे. त्यामुळे आबांच्या कार्यकर्त्याने मुकेश धिवारला काँग्रेस भवन येथेच बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये मुकेश धिवारच डोकं फुटलं आणि तो रक्तभंबाळ झाला. त्याठिकाणी सुरक्षिसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आरोपी पळून जात असताना त्याला ताब्यात घेतलं.

पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मुकेश मधुकर धिवार (वय ४८ रा. पद्मावती, सहकारनगर पुणे) याने फिर्याद दिल्यानुसार, दीपक बुक्का गावडे (रा. लक्समिनगर पर्वती पुणे) आणि त्याच्या सोबत १५ ते २० साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. सोबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअरची ४० लाख रुपयांची फसवणूक, ऑनलाईन नोकरीचे दिले आमिष, आरोपी महिला पसार

”आता तरी याच्यामध्ये बदल होणार आहे की नाही?”

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आबा बागुल यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या दरम्यान काँग्रेस भवन बाहेर मुकेश धिवार यांनी आबा बागुल यांच्या विरोधात बॅनर झळकवले होते. तर काल पुन्हा एक बॅनर त्याच्याकडून झळकवण्यात आलं होतं. ज्यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नावं लिहिण्यात आली आणि प्रश्न विचारण्यात आला की, ”आता तरी याच्यामध्ये बदल होणार आहे की नाही?”

गैरसमजातून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

या बॅनरवर पहिलं नाव होतं ते काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले उल्हास पवार, पुन्हा एक जेष्ठ मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी नगरसेवक अभय छाजेड, माजी महापौर दीप्ती ताई चौधरी, माजी महापौर कमल ताई व्यवहारे, काँग्रेस नेते वीरेंद्र किरड, काँग्रेस नेते संजय बालगुडे. अशा नेत्यांचा नाव आणि उल्लेख त्या बॅनरवर होता. परंतु आबा बागुल यांचा उल्लेखच त्या बॅनरवर नव्हता. या गैरसमजातून आबा बागुल यांच्या कार्यकर्त्यांनी मुकेशला मारहाण केली. दरम्यान, आता आबा यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.