तृतीयपंथीयांच्या अशा काही गोष्टी… ज्या वाचून तुम्हीही हादरून जाल, वास्तव आणि सत्य…

लग्नात, रस्तांवर, ट्रेन-बसमध्ये दिसणारे तृतीयपंथी राहतात कुठे? कसं आयुष्य जगतात ? कोणाची पूजा करतात? असे अनेक प्रश्न अनेकांना उपस्थित होतात. तृतीयपंथी लोक सामान्यतः असे असतात ज्यांना पुरुष किंवा महिला या श्रेणीत ठेवता येत नाही. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला या समुदायाशी संबंधित 10 खास गोष्टी सांगणार आहोत. तृतीयपंथी म्हणजे किन्नर यांचं आयुष्य सामान्य लोकांपेक्षा फार वेगळं असतं.

किन्नर यांच्या आयुष्यासंबंधित 10 खास गोष्टी

1. जेव्हा एखादा किन्नरचं निधन होतं तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार गुप्त ठेवले जातात. इतर धर्मांप्रमाणे, किन्नरांची अंतिम यात्रा दिवसाऐवजी रात्री काढली जाते.

2. किन्नरावर अंत्यसंस्कार गुप्तपणे केले जातात. माणसात्यांच्या श्रद्धेनुसार, जर एखाद्या सामान्य ने ट्रान्सजेंडरवर होणारे अंत्यसंस्कार पाहिले तर मृत व्यक्ती पुन्हा ट्रान्सजेंडर म्हणून जन्माला येतो. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, मृतदेहाला बूट आणि चप्पलने मारहाण केली जाते. असं म्हटलं जातं की यामुळे त्या जन्मात केलेल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त होतं.

3. किन्नर हिंदू धर्मातील परंपरेला मानतात, पण काही किन्नर यांचा मृतदेहाला अग्नि देण्यात येते, तर काहींचे मृतदेह पुरले जातात.

4. त्यांच्या समुदायातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, किन्नप पुढील एक आठवडा अन्न खात नाहीत.

5. किन्नर समुदाय कधीच कोणत्या सदस्याच्या मृत्यूचं शोक करत नाहीत. यामागे देखील एक कारण आहे. नरकमय जीवनातून मुक्तता मिळाली असं म्हणत इतर किन्नर आनंद व्यक्त करतात. मृत्यूनंतर, ट्रान्सजेंडर समुदाय त्यांच्या देवता अरावनची पूजा करतात आणि मृत व्यक्तीला पुढील जन्मात ट्रान्सजेंडर बनवू नये यासाठी म्हणून प्रार्थना करतात.

6. किन्नर यांचं ज्या दिवशी लग्न होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी किन्नर विधवा होतात आणि पांढरे कपडे घालतात. किन्नर यांचं लग्न देखील त्यांचे देवता अरावन यांच्यासोबत होतं.

7. बहुतेक किन्नरांच्या परंपरा हिंदू धर्मानुसार पार पाडल्या जातात, परंतु बहुतेक गुरू मुस्लिम असतात.

8. अनेक किन्नर सकाळी 6 वाजता उठतात. 10 वाजेपर्यंत आवरतात आणि 10 वाजता कामासाठी निघतात. ट्रेनमध्ये गाणी गात किन्नर पैसे कमावतात.

9. संध्याकाळी 5.30 पर्यंत ते बस्तीत परतण्यासाठी ट्रेन पकडतात. रात्री 10 वाजेपर्यंत जेवण केल्यानंतर, कॉलनीतील सर्व किन्नर रात्री 11.30 पर्यंत झोपतात.

10. इतिहासात काही किन्नरांनी युद्धे केल्याचा देखील उल्लेख आहे. त्यापैकी एक होता मलिक काफूर. त्याने दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीसाठी दख्खनमधील युद्ध जिंकले.

 

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)