हळद लावल्यावर नवरदेव-नवरीला घराच्याबाहेर का पडू देत नाही? तुम्हालाही माहीत नसेल

हिंदू धर्मात अनेक रितीरिवाज आहेत. प्रत्येक रितीरिवाजामागे काही तरी धार्मिक कारण असतं. त्यांची एक खासियत असते. लग्नातही अनेक रितीरिवाज असतात. अनेक प्रथा परंपरा असातत. त्यातील एक प्रथा म्हणजे हळद लावणं. हिंदू धर्मात लग्नात हळदीच्या कार्यक्रमाला प्रचंड महत्त्व असतं. नवरदेव नवरीला हळद लावली जाते. या कार्यक्रमाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. प्रथेनुसार लग्नात हळद लावली जाते. नवरदेव आणि नवरी दोघांनाही हळद लावली जाते. त्याचीही एक मजेशीर गोष्ट आहे.

हळद लावल्यानंतर नवरदेव आणि नवरीने घराबाहेर पडू नये अशी एक मान्यता आहे. नवरदेव आणि नवरीने हळद लावल्यानंतर घराबाहेर का पडू नये? याचं कारण माहीत आहे का? काय आहे त्याचं महत्त्व? याचीच माहिती आज आपण घेणार आहोत. हळद लागल्यानंतर नवरा-नवरीने बाहेर जाऊ नये ही केवळ अंधश्रद्धा असल्याचं असंख्य लोकांचं म्हणणं आहे. मात्र, त्यामागे इतरही काही कारणं आहेत. हळदीमध्ये एक विशेष प्रकारची गंध असते. ही गंध आजूबाजूची सर्व नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून घेत असते.

सकारात्मक-नकारात्मक प्रभाव

त्यामुळे ज्याच्या अंगाला हळद लागलेली आहे. त्याच्यावर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. व्यक्ती मानसिकरित्या सशक्त असेल तर त्याच्या शरीरात दिव्य ऊर्जा जागृत होते. नाही तर नकारात्मक गोष्टीमुळे व्यक्ती कमकुवत होतो, अशी मान्यता आहे. पण या मान्यतेला काहीच शास्त्रीय आधार नाही.

त्वचा काळी पडते

नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडल्यानंतर व्यक्ती मानसिक आणि शारीरिकरित्या त्रस्त होतो. असं झाल्यावर शुभ कामात व्यवधान येत असतं. त्यासाठी राहूचा दुष्पप्रभावही विवाहात पाहायला मिळतो, अशी मान्यता आहे. पण या गोष्टीलाही कोणता आधार नाही. मात्र, नवरा-नवरीने हळद लावल्यावर घराबाहेर पडू नये यामागे काही शास्त्रीय कारणंही आहेत. ते म्हणजे, हळद लावल्यानंतर घराच्या बाहेर पडल्यास उन्हामुळे त्वचा काळी पडते. त्यामुळे त्वचा उजळत नाही. त्यामुळेच लग्नाची हळद लावल्यानंतर नवरा-नवरीने घराबाहेर पडू नये, असं सांगितलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)