तुम्ही भेटून दाखवाच…सत्यजित तांबेंच्या दाव्याने खळबळ, राहुल गांधींचं नाव घेत काय म्हणाले?

Satyajeet Tambe On Satyajeet Tambe : जवळपास दोन दशकं काँग्रेस पक्षासाठी काम केलेल्या आणि सध्या विधानपरिषदेत अपक्ष आमदार असलेल्या सत्यजित तांबे यांनी काँग्रेसची अंतर्गत कार्यप्रणाली तसेच केंद्रीय नेत्यांसोबत राज्यपातळीवर असणाऱ्या नेत्यांचा संबंध यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी खासदार राहुल गांधी यांचे नाव घेत हे सर्व मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत.

राहुल गांधी यांना एका तासाच्या आत भेटून दाखवावं

सत्यजित तांबे यांनी सकाळ वृत्तपत्र समूहाला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना एका तासाच्या आत भेटून दाखवावं, असं खुल आव्हानच तांबे यांनी या मुलाखतीत दिलं. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि सतेज पाटील यांनी पलटवार केला आहे.

सत्यजित तांबे काय म्हणाले?

मी छातीठोकपणे सांगतो की राज्यातल्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने राहुल गांधी यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला जाऊ दाखवावं. प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला हे करून दाखवावं. हे सोडा कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधी यांना फक्त फोन करून दाखवावं, असं खुलं आव्हान सत्यजित तांबे यांनी दिलं. तसेच, अशा प्रकारचं नेतृत्त्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या जीवावर लढाई करायची? असा सवालही तांबे यांनी उपस्थित केला.

एका तासाच्या आत मोदींनी तुम्हाला…

तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकुर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांना फोन लावून दाखवावे. एका तासाच्या आत मोदींनी तुम्हाला अपॉइंटमेंट दिली तर आम्ही मान्य करू. राहुल गांधी हे भेट देतात. सत्यजित तांबे यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना काँग्रेसवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे खडे बोल ठाकूर यांनी सुनावलेत.

मी जेव्हा-जेव्हा राहुल गांधींची…

तर इतकी वर्षे काँग्रसेमध्ये राहिल्यानंतर तांबे यांनी असं बोलणं शोभत नाही. राहुल गांधी आमचे नेते आहेत. मी जेव्हा-जेव्हा राहुल गांधींची भेट मागितली आहे, तेव्हा तेव्हा त्यांनी भेट दिलेली आहे, असं सतेच पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान, आता सत्यजित तांबे यांनी केलेल्या विधानावर पडदा पडणार की या प्रकरणाला आणखी हवा मिळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)