मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे, सूर्य चांगलाच तळपत असून, उकाडा वाढला आहे. उष्णतेमुळे सध्या हालत खराब होत आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणं अशक्य झालं आहे. उकाड्यासोबतच उन्हाळ्यात आणखी एक मोठी समस्या जाणवते ती म्हणजे घराच्या कोपऱ्या-कापऱ्यात लपून बसलेल्या पाली या काळात वर येतात, सर्व घरभर या पालीचा वावर असतो. अनेक लोकांना पालीला पाहूनच भीती वाटते. विशेष: घरातील महिला पालीला पाहून जास्त घाबरतात.
मात्र आता तुम्ही पालींना न मारता, न पकडता देखील बाहेर हकलू शकता, मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती लावाव्या लागतील. या वनस्पतींच्या वासामुळे पाल तुमच्या घरातच काय पण परिसरामध्ये देखील फिरकणार नाही. या वनस्पतीचा तीव्र वास पालीला सहन होत नाही, त्यामुळे ती तुमच्या घराकडे फिरकणार देखील नाही, आज आपण अशाच काही वनस्पतींबद्दल माहिती घेणार आहोत.
लेमन ग्रास – जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लेमन ग्रासचं झाडं लावलं, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकही पाल दिसणार नाही. लेमन ग्रासचा तीव्र वास पालीला आवडत नाही, त्यामुळे ज्या घरामध्ये लेमन ग्रास असतं त्या घरामध्ये पाली आढळत नाहीत. हे झाडं अशा ठिकाणी लावा जिथून घरात पाल प्रवेश करण्याची शक्यता आहे.
पुदिना – पुदिन्याच्या वनस्पतीला देखील तीव्र वास असतो. तसेच खाण्यासाठी देखील ही वनस्पती चविष्ट लागते. पुदिन्यामधून येणारा तीव्र वास पालीला सहन होत नाही, त्यामुळे ज्या घरात पुदिना लावण्यात आला आहे, त्या घरात पाल प्रवेश करत नाही.
तुळस – तुळसीला हिंदू धर्मामध्ये पवित्र वनस्पती मानलं गेलं आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच तुळशीचा आणखी एक फायदा म्हणजे ज्या घरात तुळस असते त्या घरामध्ये पाल आढळून येत नाही. तुळसीच्या पानाचा रस काढून तो जर तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा, खिडकी अशा ठिकाणी शिंपडला तर तुमच्या घरामध्ये पाल येणार नाही.
लसून – लसनाला देखील तीव्र वास असतो, लसनाच्या वासामुळे पाल घरात प्रवेश करत नाही. तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्याला लसनाचे झाड लावू शकता, त्यामुळे पाल तुमच्या घरात प्रवेश करणार नाही.लसनासोबतच झेंडूच्या फुलाचं झाड जर तुम्ही तुमच्या घरात लावलं तरी देखील पाल घरात प्रवेश करणार नाही.