Worli Hit and Run: मिहीरचं कुटुंब अपघातानंतर का पळालं? पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती उघडकीस

मुंबई : मिहीर शहा याच्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. मिहीर शहा याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले, तर कोर्टाने मिहीर शहाची पोलीस कस्टडीत रवानगी करण्यात आली आहे. यामध्येच पोलिसांनी सांगितले की, रविवारी झालेल्या अपघातानंतर त्याची आई, बहीण आणि त्याचे कुटुंबीय खूप घाबरले होते, त्यामुळे ते लपले होते.

वरळी येथे नाखवा दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन परतत असताना त्यांच्या गाडीला बीएमडब्ल्यू कारने उडवले होते. आणि त्यानंतर कार चालकाने कारच्या चाकाखाली आलेल्या ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांना फरफटत नेले, ज्यामध्ये कावेरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात घडताच मिहीर शहा पसार झाला होता.
Worli Hit & Run Case : ओळख लपवण्यासाठी मिहीरने गाडीतच केस कापले आणि दाढी केली, १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मंगळवारी मिहीर शहाला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मिहीर शहाची आई आणि बहीण यांच्यासह १२ जणांना पोलिसांनी गडाआड केले आहे. मिहीरची आई मीना, त्याच्या बहिणी पूजा आणि किंजल यांच्यासह त्याच्या एक मित्राला ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या रिसॉर्टमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.

घटनेच्या मुख्य तपासकर्त्याने सांगितले की, ‘आम्ही मिहीरची आई, बहीण आणि मित्राचे जबाब नोंदवले आहेत, त्यांची नेमकी भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी असा दावा केला आहे की, त्यांना जमावाकडून हल्ला होण्याची भीती वाटत होती तसेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असते आणि सतत चौकशी केली असती, म्हणून आम्ही लपलो होतो.’ यामध्येच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देखील धक्कादायक बाब सांगितली ती म्हणजे, पालघरमध्ये राहणारे मिहीरचे आजी-आजोबा देखील घटना घडल्यापासून बेपत्ता आहे.आमची टीम त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा गेले दोन दिवस ते घरी नाहीत असे त्यांच्या शेजाऱ्यांकडून समजले.
तीन दिवसाने आरोपी गजाआड, मिहीरसोबत बारा जणांना अटक; नाखवा कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी वरळीतील अपघातानंतर फरार झालेला मिहीर शाह सुरुवातीला गोरेगाव येथील त्याच्या मित्राच्या घरी लपला होता, तेथून त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला आपल्या कारने पीक केले आणि ठाण्याजवळच्या परिसरात सोडले. त्यानंतर मिहीर, त्याच्या बहिणी आणि त्याची आई ठाणे, नाशिक आणि मुरबाड अशा विविध भागांतील हॉटेलमध्ये लपून बसले होते.

पोलीस सांगतात, रविवारी अपघाताच्या काही तास आधी मिहिर शाह त्याच्या काही मित्रांसह जुहू येथील एका बारमध्ये गेला होता, जिथे त्याने दारू प्यायली असे प्रथमदर्शनी दिसते. तो बारमधून बाहेर पडताच, मिहीर त्याच्या मित्रांना सोडण्यासाठी बोरिवलीला गेला आणि त्यानंतर तो आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिदावत मरीन ड्राईव्हला जॉय राइडसाठी रवाना झाले. आम्हाला कळले की पहाटे ३.३०च्या सुमारास मिहीर आणि त्याचा ड्रायव्हर मरीन ड्राइव्हच्या दिशेने निघाले होते. परत येत असताना, त्याने गाडी चालवण्याचा आग्रह धरला आणि नंतर वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली.’

मिहीरला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर राजेश शहाची सोमवारी जामीनावर सुटका करण्यात आली आहे. तर राजऋषी बिदावतला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.