मिहीरने अपघात केल्यानंतर कोणाला आपली ओळख पटू नये यासाठी मिशी आणि केस गाडीत कापली इतकेच नव्हे तर मिहीरने गाडीचा नंबर प्लेटसुद्धा बदलली ज्यामुळे पोलीसांना कोणतेही पुरावे मिळू नये ही माहिती पोलीसांनी कोर्टात दिली. आरोपी तपासात मदत करत नाही तसेच पळून जाण्यासाठी कोणी मदत केली याबद्दल सुद्धा माहिती देत नसल्याचा पोलीसांनी आरोप केला आहे. यामुळे घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलीसांनी जास्त दिवसांची कस्टडी मागितली आहे.
आरोपी सहानुभूती मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जावू शकतात त्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. अपघातात महिलेची हत्या झाली आहे, त्यामुळे पोलीसांना तपास करण्यासाठी अधिक वेळ द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी दिली आहे. तर सरकारी वकिलानंतर मिहीर शहाच्या वकिलाने युक्तीवाद केला आणि दावा केला आरोपीकडून तपासाला सहकार्य केले जात आहे. ९५ टक्के माहिती आणि पुरावे पोलीसांना मिळाले आहेत आम्ही कोणताही पुराव्याला धक्का लावला नाही असा युक्तीवाद मिहीरच्या वकीलाने केला आहे.
रविवारी सकाळी मिहीर शहाने भरधाव गाडी चालवत एका दुचाकीचा धडक दिली होती आणि त्यात महिलेचा बळी गेला आहे इतकेच नव्हे तर साधारण दोन किलोमीटर महिलेला कारसोबत फरफटत नेले इतक्या क्रूरपद्धतीने मिहीरने अपघात केल्यानंतर वडीलांना घटनेची माहिती देत मिहीर पळून गेला. यानंतर मुंबई पोलीसांनी तीन दिवस तपास करुन मिहीरला अटक केली. मिहीरला पळून जाण्यासाठी बारा जणांनी मदत केली अशी माहिती पोलीसांना मिळाली त्या साऱ्यांना पोलीसांनी अटक केली आहे.