नागपूरची महिला कारगिल मधून गायब, पाकिस्तानी धर्मगुरुला भेटण्यासाठी महिलेने…

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. अशा परिस्थिती भारतीय जवान सीमा भागांत तैनात आहेत. दोन्ही देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण असताना नागपूरची एक महिला काश्मीर मधील कारगिल मधून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. बेपत्ता झालेल्या महिलचं नाव सुनीता असून महिला 43 वर्षांची आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला गायब असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीताने पीओके बॉर्डर पार केली असून तिला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याचा संशय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेने व्यक्त केला आहे. सुनीता ही नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत कबिरनगर मध्ये राहते, आधी ती एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करायची.

पाकिस्तानमधील एका धर्मगुरुसोबत तिची ऑनलाइन ओळख झाल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. ओळख झाल्यानंतर सुनीताने पाकिस्तानी धर्मगुरुसोबत भेटण्याचे प्रयत्न सुरू केले. अमृतसरच्या अट्टारी चेकपोस्ट मधून पाकिस्तानला जाण्याचा तिने यापूर्वी दोनदा प्रयत्न केला मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणेने तिला परत पाठवलं होतं.

दोन प्रयत्न फेल ठरल्यानंतर 14 मे रोजी सुनीता तिच्या 12 वर्षीय मुलासोबत काश्मीरला गेली. कारगिल बॉर्डर वरील शेवटचे गाव हुंदरमान मध्ये ती एका हॉटेलमध्ये राहत होती. मुलाला हॉटेलमध्येच ठेऊन मी परत येते असं सांगून निघून गेली आणि परत आलीच नाही.

जेव्हा सुनीता परत आली नाही तेव्हा स्थानिकांनी 12 वर्षीय मुलाला लडाख पोलिसांच्या स्वाधीन केले. सुनीताची मानसिक स्थिती सामान्य नसून नागपूरच्या शासकीय मनोरुग्ण रुग्णालयात तिचे उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मुलाला कपडे घेऊन देते म्हणून सुनीता घरातून बाहेर गेल्याची माहिती सुनीताची आई निर्मला जामगडे यांनी दिली.

12 वर्षीय नातू हा काश्मीर मध्ये पोलीस ठाण्यात असून सुनीता बाबत स्थानिक कपिलनगर पोलिसांकडून विचारणा करण्यात आल्याची आईने सांगितले आहे.

कारगिलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन यादव यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महिला 9 मे रोजी आपल्या मुलासह कारगिलमध्ये आली होती आणि एका हॉटेलमध्ये थांबली होती. 14 मे रोजी ती हुंडरबन गावाच्या दिशेने गेली, पण परत आली नाही.” आता पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा महिलेचा शोध घेत आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)