आपल्याला ऋतु हे तर माहितच आहेत, जसे की वसंत ऋतू हा उष्ण ऋतूची सुरुवात असून फुलांच्या बहराने ओळखला जातो. उन्हाळा हा सर्वात उष्ण ऋतू असून जास्त तापमान आणि कोरडे हवामान ही याची ओळख आहे. पावसाळा हा ऋतू हिरवीगार निसर्गसौंदर्य यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असतो. शरद ऋतूची ओळख ही थंड हवामान आणि स्वच्छ आकाशाने होते. हिवाळा हा सर्वात थंड ऋतू असून कमी तापमान आणि काही वेळा धुक्याने भरलेला असतो.
जशी आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये वैशिष्ट्ये असतात तशीच ऋतूमध्ये सुद्धा काही वैशिष्ट्ये असतात. आपल्या आवडत्या ऋतूनुसार आणि आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही समान गोष्टी असतात. मग ती उन्हाळ्याची उब असुदेत की वसंताची आशा असो. प्रत्येक ऋतू हा त्याच्या वैशिष्ट्यांमुळे वेगळा असतो तर चला जाणून घेऊयात कोणत्या ऋतुशी तुम्ही सर्वात जास्त जुळता:
उन्हाळा:
जर तुम्हाला उन्हाळा आवडत असेल, तर तुम्ही उष्णता आणि उत्साहाने भरलेले आहात. तुम्ही एक्स्ट्रोव्हर्ट असण्याची शक्यता आहे. तुम्ही सकारात्मकता तुमच्या जवळच्या लोकांना पुरवता. उन्हाळ्याच्या चाहत्यांना बहुतेकदा उत्साही आणि आकर्षक लोक म्हणून पाहिले जाते. तुम्ही सहज इतरांशी जुळून जातात आणि अतिशय आत्मविश्वासू असता, नवीन अनुभवांसाठी नेहमीच उत्सुक असता आणि कोणत्याही परिस्थितीत पुढाकार घेण्यास घाबरत नाहीत.
पावसाळा:
पावसाळा आवडणारे लोक सर्जनशील आणि इतरांच्या प्रति सहानुभूती दाखवणारे असतात. जर तुम्हाला पावसाळा आवडत असेल तर याचा अर्थ तुम्ही कोणताही बदल सहज स्वीकारता. तुम्ही अशी व्यक्ती आहात जी इतरांबद्दल सहानुभूती दाखवते आणि साध्या गोष्टींमध्ये आनंद मिळवते.
वसंत:
वसंत ऋतू आवडणारे लोक हे आशेने भरलेले असतात. जर तुम्हाला वसंत ऋतू मोहक वाटत असेल, तर तुम्ही बदलातील सौंदर्य पाहणारे आणि नवीन सुरुवातींसाठी उत्सुक असणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहात. तुम्ही अनेकदा इतरांना प्रोत्साहन देत असता. वसंत ऋतूची आवड असणे हे दर्शवते की तुम्ही आशावादी आणि दयाळू आहात. तुम्हाला नवीन सुरुवातींवर विश्वास आहे आणि तुम्हाला इतरांना प्रेरित करायला आवडते. सामाजिक वर्तुळात तुम्ही बहुधा शांत किंवा प्रेरणा देणारे व्यक्ती असता.
शरद:
शरद ऋतू आवडणारे लोक खूप विचार करणारे आणि प्रत्येक निर्णय खूप विचारपूर्वक घेणारे असतात. ज्यांना शरद ऋतू आवडतो ते विचारशील आणि जीवनातील साध्या गोष्टींची मनापासून प्रशंसा करणारे असतात. जर शरद ऋतू तुमचा आवडता ऋतू असेल, तर तुम्ही विचारशील, विश्वासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाता.
शरद ऋतूला प्राधान्य देणे हे दर्शवते की तुम्ही तुमच्या वयाच्या मानाने अधिक शहाणे आहात आणि मोठ्या चित्राकडे पाहू शकता. तुम्हाला प्रामाणिकपणा आणि साधेपणा आवडतो, त्यामुळे मोठ्या गोंधळापेक्षा जवळच्या मित्रांसोबत शांत संध्याकाळ घालवणे तुम्हाला आवडते.
हिवाळा:
हिवाळा आवडणारे लोक एकांतप्रिय आणि इंट्रोव्हर्ट असण्याची शक्यता आहे. हिवाळा आवडणारे लोक विचारशील आणि स्वतःसोबत वेळ घालवण्यास आनंद मानणारे असतात. जर तुम्हाला हिवाळा प्रिय वाटत असेल, तर तुम्ही शांत, आरामदायक क्षणांची प्रशंसा करता आणि वाचन, लेखन यांसारख्या शांत छंदांमध्ये आनंद शोधता.
हिवाळा निवडणे दर्शवते की तुम्ही शहाणे आहात. तुम्हाला जीवनाच्या गूढ गोष्टी समजून घेण्याची नैसर्गिक आवड आहे आणि तुम्ही स्वतःला तसेच इतरांना खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करता. हिवाळा आवडणारे लोक सहसा विश्वासू मित्र असतात आणि उत्कृष्ट सल्ला देतात.
प्रत्येक ऋतू हा आपल्याला नवीन गोष्टी आपल्या पद्धतीने शिकवत असतो.
(डिस्क्लेमर: व्यक्तिमत्त्व हे अनेक घटकांवर अवलंबून असते, त्यामुळे या निरीक्षणांना पूर्णपणे उचित मानणे बरोबर नाही. )