राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा कम्प्लसरी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर रान पेटले आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम या धोरणाला विरोध केला आहे. तर हिंदी भाषा आमच्यावर लादला तर संघर्ष अटळ आहे असे राज ठाकरे यांनी कालच वक्तव्य केले आहे. त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदीची जबरदस्ती का ? असा सवाल करीत राज ठाकरे यांच्या मुद्द्याची रि ओढली आहे. त्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपल मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांच्या सोबत यायला तयार आहोत. परंतू उद्धव ठाकरे यांनी देखील एक अट पाळावी अशी मागणी राज यांनी केली आहे. या मुद्यांवर आता राज्यातील इतर नेत्यांनी प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले की…
राज ठाकरे यांनी टाळी दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे. याबाबत ते म्हणाले की माझं मत असं आहे की दोघेही जण हातात हात घेत असेल तर आपण कशाला बोलायचं त्याच्यांत. दोन भाऊ एकत्र येत असेल तर आपण कशाला निष्कारण बोलायचं काही कारण नाही. त्यात काय वाईट आहे अशी प्रतिक्रीया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत यावर ते म्हणाले की यांनाच लगीन घाई लागलेली असते. राज ठाकरे यांच्या घरात चहा, नाश्ता पण चांगला मिळतो.त्यांना आवडतं तिकडे जाऊन बसायला असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.