नरेंद्र मोदी, संजय राऊतImage Credit source: ANI
केंद्र सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता लवकरच हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेसाठी येणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खसादार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 2025 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का? हा माझा प्रश्न आहे. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या योजना नरेंद्र मोदी यांच्या आहेत. त्याच्यातलीच एक म्हणजे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही त्यांची संकल्पना… या देशामध्ये संघराज्यपद्धती आहे. प्रत्येक राज्याची सामाजिक, राजकीय परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणचं वातावरण वेगळं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
जम्मू काश्मीरची निवडणूक तुम्ही लोकसभेबरोबर घेऊ शकत नाही. ईशान्येकडे तुम्ही एकत्र निवडूक घेऊ शकत नाही. काही राज्यात तुम्ही सात- सात टप्प्यात निवडणुका घेत आहात. फक्त तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेत आहात. राज्याचे प्रश्न वेगळे असतात आणि देशाचे प्रश्न वेगळे असतात. त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं. हे आपण 70-75 वर्षांपासून पाहत आहोत. तुम्ही मुंबई महानगर पाहिलेची निवडणूक अद्याप घेऊ शकलेला नाहीत. तुम्ही महाराष्ट्रातील स्थानि स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेतल्या नाहीत. कारण तुम्हाला हारण्याची भीती वाटते , असं संजय राऊत म्हणालेत.