लग्न हा भारतीय परंपरेत पवित्र संस्कार आहे. पती अन् पत्नीचे सात जन्माचे बंधनही लग्नास म्हटले जाते. हिंदू धर्मात लग्नाच्या अनेक प्रथा आहेत. लग्नादरम्यान अनेक प्रकारचे विधी केले जातात. त्यापैकी एक म्हणजे घोडीवर बसून लग्नाची मिरवणूक काढली जाते. वर नेहमी घोडीवर स्वार होऊनच वधुला घेण्यासाठी जातो. पण तुम्हाला त्यामागचे कारण माहीत आहे का.
नवरा मुलगा घोडा ऐवजी घोडीवर बसण्याची अनेक कारणे आहेत. परंतु त्यातील प्रमुख कारण आरोग्याशी संबंधित आहे. घोडीवर बसणे हे नवरदेवाच्या चांगल्या आरोग्याचे प्रतिक आहे. तसेच घोडीची लगान सांभाळण्याचा अर्थ नवरा मुलगा परिवाराची दौर सांभाळण्यास समर्थ झाला आहे.
घोडीवर बसणे म्हणजे वरासाठी एक प्रकारची परीक्षा असते. खरे तर घोडी स्वभावाने खूपच चंचल असते. या परिस्थितीत जर मुलगा यशस्वीपणे घोडीवर आरूढ झाला तर तो आपल्या पत्नीच्या चंचल मनाला प्रेमाने आणि संयमाने हाताळू शकतो असे मानले जाते. तसेच घोडी चढला म्हणजे तो आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळेल, असेही म्हटले जाते.
घोडा ऐवजी घोडीच का?
घोडा ऐवजी घोडीच का वापरली जाते? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घोड्यावर का बसवले जात नाही. त्याच्यामागे तर्क असा मांडला जातो की, घोडा स्वभावाने आक्रमक असतो. त्याला प्रशिक्षण दिल्यावर तो नियंत्रणात राहू शकतो. यामुळे घोड्यावर बसणे प्रत्येकाच्या नियंत्रणातील बाब नाही. तसेच बँडच्या आवाजाने घोडा घाबरु शकतो. घोडा उधळला तर ते धोकादायक ठरु शकते. घोडीचा स्वभाव शांत असतो. त्यामुळे घोड्याऐवजी घोडी वापरली जाते.
जुन्या काळात लग्नाच्या प्रसंगी वरला आपली शौर्य दाखवावे लागत होते. त्यामुळे युद्धात घोड्यावर ते जात होते. इतिहासात पहिले तर असे दिसते की, नवरदेवाला लग्नासाठी युद्धही करावे लागले आहे. त्यामुळे घोड्यास शौर्याचे प्रतिक मानले जावू लागले. त्यानंतर काळानुसार घोड्याच्या ठिकाणी घोडीचा वापर होऊ लागला.