Vietnam and Rahul GandhiImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
BJP slams Rahul Gandhi for visiting Vietnam: विरोधी पक्षनेते राहुल गांधी व्हियेतनाम दौऱ्यावर गेले. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर आरोप सुरु केले आहेत. भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी आपल्या मतदार संघापेक्षा जास्त दिवस व्हियेतनाममध्ये असतात, असा आरोप केला. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधी व्हियेतनाममध्ये गेले होते, असा आरोप भाजपने केला होता. भारतीयांना व्हियेतनाम का आवडतो? दोन्ही देशांचे संबंध कसे आहेत? जाणून घेऊ या…
निसर्ग सौदर्य अन् भारतीय रुपयांची पॉवर
व्हियेतनाम हा निसर्ग सौदर्यांने नटलेला देश आहे. त्यामुळे पर्यटकांना व्हियेतनामचे आकर्षण असते. या ठिकाणी व्हिसा सहज मिळतो. ही प्रक्रिया ऑनलाइन आहे. तसेच भारतीय रुपयाची पॉवर त्या ठिकाणी दिसून येते. भारताचा एक रुपया व्हियेतनाममध्ये तीनशे रुपये होतात. यामुळे त्या ठिकाणी राहणे आणि खाणे-पिणे स्वस्त आहे.
उद्योग व्यापारात आघाडी
व्हियेतनाममध्ये भारताचे 350 पेक्षा जास्त प्रकल्प आहे. त्यात उर्जा, खनिज, कॉफी, चहा, साखर, आयटी, फार्मा या क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच दोन्ही देशांचे संबंध चांगले आहेत. उद्योग व्यापाऱ्यात भारताचा वाटा वाढल्यावर त्या ठिकाणी जाणारे भारतीय वाढणे स्वाभाविक आहे.
शिक्षण अन् रोजगार
व्हियेतनाममध्ये 240 विद्यापीठे आहेत. भारतीय मुलांसाठी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. एमबीबीएससह इतर अभ्यासक्रमासाठी भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी जातात. तसेच रोजगाराच्या अनेक संधी आहेत. आयटी, इंफ्रा, फार्मा क्षेत्रात चांगल्या संधी मिळतात.
दोन्ही सांस्कृतीत समानता
भारत आणि व्हियेतनाम यांच्या संस्कृतीत समानता आहे. त्या ठिकाणी अनेक हिंदू मंदिरे आहेत. जेवणासाठी ठिकठिकाणी भारतीय रेस्टरंट सहज मिळतात. त्यामुळे व्हियेतनामचे पर्यटन भारतीयांना आकर्षित करत असते.
व्हियेतनाम सुरक्षित देश
व्हियेतनाम एक सुरक्षित देश आहे. त्या ठिकाणी जीवन शांत आहे. गुन्हेगारी जवळपास नाही. पर्यटकांसाठी या सर्व बाबी फायदेशीर आहे. निसर्ग सौदर्य, स्वस्त देश, सुरक्षितता असल्यावर कोणीही त्या ठिकाणी जाईल. यामुळे व्हियेतनाममध्ये भारतीय जास्त जातात.