बाळाच्या काळजीने आईचे काळीज का कठोर झाले?, पोटावर विळ्याचे ६५ चटके, अखेर देवदूत म्हणून डॉक्टरचे पुढे आले….

हृदयाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या 22 दिवसांच्या चिमुकल्याला अंधश्रद्धेतून त्याच्या आईने चक्क पोटावर चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.आता याच चिमुकल्यावर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु झाले असून त्याच्या हृदयावर जटील शस्त्रक्रिया करुन या बाळाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या मुलाच्या हृदयावर शस्रक्रिया करण्यासाठी अमरावतीचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन या चिमुकल्याला अखेर नवीन जीवन मिळाले आहे.

अवघ्या 22 दिवसांच्या चिमुकल्याला अंधश्रद्धेतून त्याच्या आईने चक्क पोटावर चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या चिमुकल्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासन आणि पोलिसांना सूचना देत रुग्णालयात या मुलाला उपचारासाठी पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर या बाळावर डॉक्टरांना शर्तीचे प्रयत्न करीत त्याच्या जीव वाचवण्यात यश आले.

श्वास घ्यायला त्रास होत होता

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम आदिवासी भागामधील सिमोरी गावात 22 दिवसाच्या बाळाला सातत्याने श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं ते सारखे रडत होते. त्या बाळाच्या आईने अंधश्रद्धेपोटी विळ्याने या नाजुक कोवळ्या बाळाला 65 चटके दिल्याची बाब उघडकीस आली. अंधश्रद्धेतून केलेल्या प्रकारामुळे पालकांवरच चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ह्या बाळाला अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्याला नागपूरातील खाजगी रुग्णालयात ऑपरेशनसाठी नेण्यात आले.

बाळ दूध सुद्धा प्यायला लागलं

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ही बाब कळताच त्यांनी मुलाला उपचारासाठी नागपुरातील नेल्सन या खाजगी रुग्णालयात पाठवले.बाळाची प्रकृती गंभीर असताना छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणे कठीण होते. सुरुवातीला त्याच्या छातीत झालेले संक्रमण कमी करण्यासाठी डॉक्टराच्या टीमने 10 दिवस उपचार केले. त्यानंतर बळाच्या हृदयावर जटील अशी शस्त्रक्रिया करण्यात आली.त्यानंतर दहा दिवस लोटले असून बाळ आता बरं झालेले आहे. आता हे बाळ दूध सुद्धा प्यायला लागलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसात त्याला डिस्चार्ज होणार असल्याचं सुद्धा डॉक्टरकडून सांगण्यात आले..

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)