घरात न सांगता ऋषिराज बँकॉककडे का गेला? तानाजी सावंत यांच्या मोठ्या मुलाने केला खुलासा

Tanaji Sawant Son Rushiraj Sawant: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा सोमवारी दुपारीपासून बेपत्ता झाला होता. त्यासंदर्भात पुण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तो मित्रांसोबत खासगी विमानाने बँकॉकला गेल्याचे स्पष्ट झाले. रात्री ९ वाजेच्या सुमारास तो परत आला. आता या सर्व प्रकरणावर ऋषीराज सावंत याचे बंधू गिरीराज सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीराज सावंत यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी ३.३० वाजता ऋषीराजचा मेसेज आला. तो दोन दिवस बाहेर जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याने फोन स्विचऑफ केला. आम्हाला तो कुठे गेला? कोणाबरोबर गेला? कशासाठी गेला? त्याची काहीच माहिती नव्हती. वडील या नात्याने तानाजी सावंत चिंताग्रस्त झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. घरात आम्ही रोज कोण कुठे असणार आहे, त्याची माहिती देत असतो. न सांगता कोणीच कुठे जात नाही, असेही गिरीराज सावंत यांनी म्हटले.

यामुळे न सांगता गेला?

आठ दिवसांपूर्वी ऋषीराज दुबईत व्यावसायिक कामासाठी गेला होता. त्यानंतर आता पुन्हा व्यावसायिक कारणासाठी तो बँकॉकला जात होतो. दुबईला आठ दिवस थांबल्यानंतर बँकॉकला कोणी जावू देणार नाही, असे त्याला वाटले. त्यामुळे भीतीपोटी घरात न सांगता तो गेला. मी दोन दिवस बाहेर जात आहे, असे सांगून ऋषीराज याने फोन बंद केला होता. त्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो होतो, असे गिरीराज सावंत यांनी म्हटले.

भारताच्या या जातीच्या गाईने तोडले जगातील सर्व विक्रम, 40 कोटींमध्ये विक्री, गिनीज बुकात नोंद

Image

भारत 1, ब्राझील 2…,अमेरिका अन् चीन जवळपाससुद्धा नाही, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा अहवाल

Image

बहिणीच्या लग्नात 22 वर्षीय युवतीचा 3 मिनिटे जबरदस्त डान्स, नंतर स्टेजवर ह्रदयविकाराचा झटका, व्हिडिओ आला समोर

Image

50 हजारांचे एक कोटी करणारा हा शेअर, 10 वर्षांत 22,100 टक्के रिटर्न, कधी किंमत होती 2 रुपये

विरोधकांनी राजकारण करु नये

ऋषीराज सावंत प्रकरणात सुषमा आंधळे यांनी तानाजी सावंत यांच्याकडून सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप केला. त्यावर गिरीराज सावंत म्हणाले, हा कुटुंबाचा विषय आहे. विरोधकांनी यावर राजकारण करु नये. ही वेळ कोणावर येऊ शकते. अशी वेळ कोणावर येऊ नये, अशीच आमची इच्छा आहे. या गोष्टीवर आता पडदा टाकायला हवा, असे गिरीराज सावंत यांनी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)