रेल्वे जमिनीवरचे 306 पैकी 103 होर्डिंग्ज कोणी बसविले? पालिका म्हणते आम्हाला काय माहिती ? RTI मधून खुलासा

घाटकोपर येथील भलेमोठे होर्डिंग्ज कोसळुन गेल्या वर्षी अनेकांचा मृत्यू झाला होता. तरीही होर्डिग्ज बाबात शासनाच्या दोन संस्थामध्ये समन्वय नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण 306 होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. मात्र त्यातील 103 होर्डिंग्ज कोणी बसविले याची माहीती आपल्याकडे नसल्याचे उत्तर महानगर पालिकेने माहीतीच्या अधिकारात दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्यावर्षी घाटकोपर येथे रेल्वेच्या मालकीच्या जमीनीवरील भलेमोठे होर्डिंग्ज कोसळुन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणात या होर्डिंग्जला कशी काय मंजूरी मिळाली यावरुन महानगर पालिका आणि रेल्वे तसेच जीआरपी या यंत्रणांमध्ये जुंपली होती. त्यानंतर या रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरील होर्डिंग्जचा विषय त्यामुळे ऐरणीवर आला होता. आता यासंदभार्त माहीती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगर पालिकेला माहीती विचारली होती. या माहीतीमध्ये महानगर पालिकेने हात वर केले आहेत.

 103 होर्डिंग्ज कोणी बसविले याची माहीती नाही

मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण 306 होर्डिंग्ज उभारले गेले आहेत. यात मध्य रेल्वेच्या जमिनीवर 179 तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर 127 होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या 179 होर्डिंग्जपैकी 68 आणि पश्चिम रेल्वेच्या 127 होर्डिंग्जपैकी 35 होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडे उपलब्ध नाही असे धक्कादायक उत्तर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळाले आहे.

याची कोणतीही माहीती पालिकेकडे नाही

मुंबई महापालिकेच्या लायसन्स  अधीक्षक कार्यालयाकडे शहरातील होर्डिंग्ज संदर्भातील विविध माहिती विचारली होती. त्यानुसार, लायसन्स अधीक्षक कार्यालयाने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या जमिनीवरील होर्डिंग्जची आकडेवारी उपलब्ध करून दिली. पश्चिम रेल्वेच्या जमिनीवरील 127 होर्डिंग्ज आहेत. यात ए वॉर्डात 3, डी वार्डात 1, जी दक्षिण 2, जी उत्तर 12, के पूर्व 2, के पश्चिम 1, पी दक्षिण 10 तर आर दक्षिण 4 असे 35 होर्डिंग्ज पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर आहे ज्याचा कोणी मालक नाही तर मध्य रेल्वेच्या जमिनीवरील 179 होर्डिंग्ज आहेत यात ई वॉर्डात 5, एफ दक्षिण वॉर्डात 10, जी उत्तर वॉर्डात 2, एल वॉर्डात 9 आणि टी वॉर्डात 42 असे 68 होर्डिंग्ज मध्य रेल्वेच्या जमिनीवर आहे ज्याचा कोण मालक आहे याचा कोणतीही माहीती मुंबईच महानगर पालिकेकडे नाही असे माहीतीच्या अधिकारात उत्तर मिळाल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)