जेवणानंतर की आधी, कधी प्यावा चहा ? चहाप्रेमींसह सर्वांनीच जाणून घ्या

आपल्यापैकी बहुतेक लोकं सकाळची सुरुवात एक कप चहाने करतात. सकाळी चहा मिळाला नाही तर संपूर्ण दिवस कंटाळवाणा आणि थकवा जाणवतो. कारण चहामध्ये कॅफीन असते, ज्यामुळे चहाच्या सेवनाने आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते ज्यामुळे सकाळी ताजेतवाने वाटते. अनेकांना नाश्ता करताना चहा प्यायला आवडतो, तर काहीजण नाश्त्याआधी रिकाम्या पोटी चहा पितात. त्यामुळे चहा जेवणाआधी प्यावा की नंतर प्यावा असा गोंधळ अनेकांच्या मनात असतो? तर यासाठी आजच्या लेखातून तुमचा हा गोंधळ दूर करण्यासाठी आहारतज्ज्ञांकडून याबाबत जाणून घेऊयात.

आहारतज्ज्ञ यांच्या मते चहा पिण्यासाठी योग्य वेळ कोणतीच नसते. सकाळी आपण 8 तासांची पूर्ण झोप घेऊन उठतो, त्यामुळे अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा पातळी कमी झालेली असते. अशा स्थितीत तुम्ही जेव्हा चहा पिता तेव्हा शरीराला झटपट ऊर्जा मिळते. मात्र ज्या लोकांना रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ॲसिडीटी, गॅस किंवा पोटाच्या इतर समस्यांचा त्रास होत असतो. अशा लोकांनी नाश्त्यानंतर काही वेळाने चहा प्यावा. नाश्ता करण्याच्या आधी किंवा नंतर लगेच चहा पिणे टाळावे. यामुळे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण कमी होऊ शकते.

आहारतज्ञांच्या मते, जेवणा झाल्यानंतर अर्ध्या तासाने चहा प्यायल्यास काही फायदे मिळू शकतात. या काळात पचनक्रिया वेगवान होऊन पचनक्रिया सुधारते. चहामध्ये टॅनिनसह काही संयुगे असतात, जे अन्नाचे योग्य पचन करण्यास मदत करतात. खाल्ल्यानंतर चहा घेतल्याने पोटातील गॅस किंवा अपचनाची समस्या दूर होते. मात्र हे देखील लक्षात ठेवा की, जास्त चहाचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडू शकते. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगा आणि योग्य प्रकारे चहाचे सेवन करा. जर तुम्हाला पोटाची समस्या नसेल तर तुम्ही जेवणाच्या 30 ते 60 मिनिटे आधी चहा पिऊ शकता.

तज्ज्ञांच्या मते चहा पिण्याची योग्य वेळही तुमच्या शरीरावर आणि आरोग्यावर अवलंबून असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुम्हाला बरे वाटत असेल आणि तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत नसेल तर तुम्ही चहाचे सेवन करू शकता. जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या असेल तर जेवणाआधी चहा पिणे टाळावे. तर जेवणानंतर एक तासाने चहा प्या. यामुळे तुम्हाला ताजेपणा वाटेल. तसेच ऊर्जा देखील मिळेलच पण त्याचसोबत पचनक्रियाही सुधारेल. चहा प्यायल्याने तुमचा मूडही सुधारू शकतो. हे देखील महत्वाचे आहे की लोकांनी दिवसातून फक्त 2-3 कप चहा प्यावे. जास्त चहा प्यायल्याने आरोग्यावरही परिणाम होतो आणि अनेक समस्या निर्माण होतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)