पपईसोबत काय खाऊ नये, तुमचाही गोंधळ होतो का? हे पदार्थ तर बिलकूल…

धगधगत्या जीवनशैलीमुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतो. निरोगी राहण्यासाठी अनेक लोक सीजननुसार खाद्यपदार्थ आणि फळे खात आहेत. पण कधी कधी अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यानंतर लोक वेगवेगळ्या पदार्थांचे एकत्र सेवन करायला लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने आरोग्याला हानी देखील होऊ शकते? पपई हा असाच एक पदार्थ आहे. तज्ज्ञांच्या मते, पपईसोबत काही विशिष्ट गोष्टी खाणं टाळावं. अन्यथा, लाभाऐवजी नुकसान होऊ शकतं. मग प्रश्न पडतो, पपईसोबत नेमकं काय खाऊ नये? आणि का? यावर टाकलेला हा प्रकाश.

पपईसोबत हे पदार्थ खाणे टाळा –

पपई-दही :

आयुर्वेदानुसार, पपई आणि दही हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. पपई उष्ण तर दही थंड आहे. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास सर्दी, ताप, डोकेदुखी यांसारख्या समस्या होऊ शकतात. जर हे खायचंच असेल, तर दोन्हीच्या सेवनात किमान 1 तासाचं अंतर ठेवावं.

पपई-दूध:

पपईसोबत दूध घेतल्यास पचनाच्या समस्या होऊ शकतात. एकत्र खाल्ल्यास बद्धकोष्ठता (कब्ज) आणि अतिसार (डायरिया) होऊ शकतो. याशिवाय, पोटात मळमळ किंवा वेदना देखील होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही पदार्थांमध्ये किमान अर्ध्या तासाचं अंतर ठेवणं चांगलं.

पपई-कारलं :

पपईसोबत कारलं खाणं आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. कारण पपईमध्ये भरपूर पाणी असतं आणि पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, तर कारलं शरीरातील पाणी शोषतो. त्यामुळे यांचे गुणधर्म पूर्णपणे विरुद्ध असतात. विशेषतः मुलांसाठी हा कॉम्बिनेशन अधिक नुकसानदायक ठरतो.

पपई-संत्री:

पपई आणि संत्री दोन्ही फळं चवीलाही आणि गुणधर्मांनीही एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. पपई गोडसर असते, तर संत्रं आंबटसर असतं. या दोन्ही फळांचं एकत्र सेवन केल्यास शरीरात विषारी घटक (टॉक्सिन्स) तयार होऊ शकतात, ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि अतिसार होऊ शकतो.

पपई-लिंबू:

पपईसोबत लिंबू खाणं आरोग्यासाठी घातक असू शकतं. अनेकदा लोक पपईच्या फळाच्या चाटमध्ये लिंबू पिळतात, परंतु असं करणं चुकीचं आहे. या दोन्हींच्या एकत्र सेवनाने पचनसंस्थेच्या समस्या आणि रक्ताशी संबंधित त्रास होऊ शकतात. विशेषतः मुलांना पपई देताना त्यावर लिंबू न पिळण्याची काळजी घ्यावी.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)