मुंबईवर पाणबाणी? तब्बल 1500 टँकरचा पाणीपुरवठा ‘या’ दिवसापासून बंद; नेमकं कारण काय?

Mumbai Water Supply : सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीने घातलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबईवर पाणीबाणी येण्याची शक्यता आहे. कारण आज (9 एप्रिल) मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी 1500 टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्या मुंबईत पाळणे अशक्य आहे. त्यामुळे अटींमध्ये सूट मिळायला हवी. नाईलाजाने हा पाणीपुरवठा बंद करावा लागत आहे. यामुळे मुंबईवर मोठा होईल, अशी प्रतिक्रिया टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईतील विविध भागात आधीच पाणीपुरवठा सुरळीत नसताना वॉटर टँकर बंद झाल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत हॉस्पिटल, गार्डन, रस्त्यांची कामे , उड्डाणपुलाची कामे, इमारती, आरएमसी मिक्सर प्लांट, डीप क्लीनिंग , IPL क्रिकेट मॅच यासाठी पाण्याची मोठी गरज भासते. असे असताना सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीच्या या निर्णयामुळे मुंबईत मोठी पाणीटंचाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सेंट्रल ग्राउंड वॉटर अॅथॉरिटीच्या नियमावली कोणत्या आहेत?

1- 200 चौरस मीटर किंवा त्याहून अधिक आकाराची जमीन टँकरमालकाकडे आवश्यक.

2- टँकरच्या मालकीचा/लीजचा पुरावा आवश्यक

3- सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीचे एनओसी प्रमाणपत्र आवश्यक

4- रोजचा उपसा मोजण्यासाठी ‘डिजिटल वॉटर फ्लो मीटर’ बंधनकारक

5- टँकरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या ‘बीआयएस’ दर्जा मानकाचे पालन आवश्यक.

6- भूजल उपसण्याचे प्रमाण

दरम्यान, आता या सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीच्या या निर्णयानंतर आता नेमका काय होणार? प्रशासन काही प्रतिबंधात्मक उपाय करणार का? तसेच काही पर्यायी व्यवस्था केली जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)