मुंबईवरील पाणीबाणीवर आज तोडगा निघणार, महापालिकेचे आदेश काय?

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या (CGWA) नवीन नियमांमुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12.30 वाजता मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे शिष्टमंडळ मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहे. महापालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. यावेळी मुंबई वॉटर टँकर असोसिएशन त्यांच्या समस्या मांडणार आहेत.

मुंबई महापालिकेकडून आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू केल्यानंतरही मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आपल्या संपावर ठाम आहे. याबद्दलची सी जी डब्ल्यू ए एनओसी घेण्यास वॉटर टँकर असोसिएशन तयार आहे. मात्र यामध्ये मुंबईसाठी नियमांमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनची आहे. त्यामुळे मागील चार दिवसापासून आज संप पुकारण्यात आलेला आहे. त्यानंतर आज टँकर असोसिएशनचे पदाधिकारी महापालिका आयुक्त भूषण गगराणी त्यांच्याशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा करणार आहेत

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीविरोधात मुंबईतील टँकरचालकांनी १० एप्रिलपासून संप पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्तीमंत्री सी.आर. पाटील यांच्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने विहीर आणि कूपनलिकाधारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली. मात्र टँकरचालक संप मागे घेत नसल्याने व्यापक जनहित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करून त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेऊन मुंबई महापालिका खासगी गृहनिर्माण संस्था (सोसायटी) यांच्यासह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. त्याकरिता मुंबई महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती देखील निश्चित केली आहे.

पालिकेचे आदेश काय?

● ही परिस्थिती लक्षात घेता, व्यापक जनहिताकरिता या समस्येचे निराकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे.

● या कायद्यातील कलम ३४ (अ) तसेच कलम ६५ (१) द्वारे महानगरपालिका प्रशासनाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार, मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.

● तसेच या टँकरने मुंबई महापालिकेची यंत्रणा पाणीपुरवठा करणार आहे. या कार्यपद्धतीमध्ये पालिकेची यंत्रणा, टँकरचालक, क्लीनर तसेच टँकरचालकांचे कार्यालयीन कर्मचारी, ट्रॅफिक पोलीस, पोलीस यांचीही मदत घेतली जाईल.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)