सध्या तिघांचंच सरकार? इतरांचा शपथविधी वेटिंगवर?; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा अर्थ काय?

बहुमताच्या लाटेवर स्वार होत आज महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ होत आहे. आज 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारचा नेत्रदीपक शपथविधी सोहळा मुंबईत होत आहे. आझाद मैदान त्यासाठी सजलं आहे. राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. या ग्रँड शपथविधीसाठी लाडक्या बहि‍णींपासून ते चहावाला आणि अनेक दिग्गजांना आमंत्रण धाडण्यात आले आहे. विरोधी पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांना आणि शिलेदारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आज भाजपाच्या गटनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतील. पण इतरांचा शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे याविषयीचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. काय म्हणाले बावनकुळे?

1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांची शपथ

आज कुणा-कुणाचे शपथविधी होतील, याविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाकीत केले आहे. आज कोण शपथ घेणार याची यादी राज्यपालांकडे जाते. आज मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा आज शपथविधी होईल, असे चित्र दिसत असल्याचा अंदाज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष असल्याचे ते म्हणाले. महायुतीच्या तीन मोठ्या नेत्यांनी अथवा वरिष्ठांनी काही निर्णय घेतला, तर त्याची वाट पाहू असे बावनकुळे म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)