छगन भुजबळ आणि अजित पवारImage Credit source: tv9 marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली होती. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले. एकीकडे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घडत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार हे पुण्यातील सारथीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी सारथी कार्यालयाला भेट दिली. यावेळी अजित पवारांनी सारथीचे संचालक काकडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले.
छगन भुजबळ यांनी नुकतंच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ते लवकरच दिल्लीला जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे, ते नाराज आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी आमचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही तो प्रश्न पक्षातंर्गत सोडवू, अशी प्रतिक्रिया दिली.