पुण्यातील पबमध्ये चाललंय काय? स्वच्छतागृहात जे सापडले त्यानंतर पबमधील धक्कादायक गैरप्रकार समोर

पुणे शहराला देशाची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. कधीकाळी पुण्याच्या संस्कृतीचे दाखले जगभरात दिले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पुणे बदलले आहे. सांस्कृतिक पुण्यातील संस्कृती हारवली की काय? असा प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना समोर येत असतात. पुणे शहरातील पबमध्ये अनेक गैरप्रकार सुरु आहे. मादक पदार्थांच्या घटनाही पुण्यातून समोर येत असतात. गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँग अधूनमधून डोके वर काढत असते. आता पुण्यातील एका पबचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्वच्छतागृहातील त्या व्हायरल व्हिडिओनंतर पुणे शहरात काँग्रेस आक्रमक झाली आहे.

स्वच्छतागृहात मिळाले कंडोम

पुण्यातील एस्कॉड नावाच्या पबच्या स्वच्छता गृहातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये पबमधील स्वच्छतागृहात कंडोम पडल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ 15 मार्चचा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुण्यातील पबमध्ये नेमके काय सुरु आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युवक काँग्रेसच्या वतीने पबमालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जाते. काँग्रेसने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि स्थानिक पोलीस स्टेशनला यासंदर्भात पत्र दिले आहे.

पुणे शहरातील पबमध्ये नववर्षाच्या सुरुवातीलाच धक्कादायक प्रकार घडला होता. नवीन वर्षाच्या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांना कंडोम आणि ओआरएस (ओरल रिहाइड्रेशन सॉल्यूशन) वाटप करण्यात आले होते. हे प्रकरण पुण्यात चांगलेच तापले होते. त्यानंतर आयोजकांनी माघार घेतली होती. त्यामुळे पुणे शहरातील पब संस्कृतीत काय, काय सुरु आहे, ते समोर आले होते. परंतु या प्रकरणात ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडत आहे.

व्हायरल व्हिडिओवरुन पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. यामुळे पोलिसांनी ज्या पबमध्ये गैरप्रकार सुरु आहे, त्याठिकाणी ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)