सिंदूर बनवण्यासाठी कोणत्या फळाचं बी वापरतात?Image Credit source: TV9 Gujrati
पहेलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. संपूर्ण देशाल भारतीय सैन्याचा अभिमान आहे. भारतात, बहुतांश भागात, लग्नानंतर महिला सिंदूर लावतात. हिंदू धर्मात, सिंदूर हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. पण हा सिंदूर कशापासून बनवला जातो याचा विचार कधी केला आहेत का ? चला जाणून घेऊया.
सिंदूर बनवण्यासाठी कोणत्या फळाचं बी वापरतात?
सिंदूराचे एक झाड असतं आणि या झाडाला इंग्रजीत कुमकुम ट्री म्हणतात. कुंकवाच्या झाडाला कामील वृक्ष असेही म्हणतात. या झाडाच्या फळाचा वापर सिंदूर बनवण्यासाठी केला जातो. या झाडाच्या बिया बारीक करून सिंदूर बनवलं जातं, याची तुम्हाला कल्पना आहे का ?
भारतातील कोणत्या राज्यात सिंदूरची लागवड केली जाते ?
भारतातील 2 राज्यांमध्ये सिंदूरचे झाड सहज आढळते. महाराष्ट्रात या झाडाची लागवड केली जाते. याशिवाय, हिमाचल प्रदेशातील काही भागात सिंदूरची लागवड देखील केली जाते. भारतीय संस्कृतीत इतके महत्त्व असलेले सिंदूरचे झाड महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशात आढळते. या फळाच्या बियांचा वापर हर्बल लिपस्टिक बनवण्यासाठी देखील केला जातो.
कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण भारताव्यतिरिक्त काही ठिकाणी या झाडाची लागवड केली जाते. कुमकुमची झाडे दक्षिण अमेरिकेत देखील आढळतात. कुमकुमच्या झाडाची उंची 20 ते 25 फूट असू शकते. सुरुवातीला या झाडाला हिरवी फळे येतात, परंतु हळूहळू या फळाचा रंग लाल होतो.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. त्यामध्ये दहशतवाद्यांनी 26 पुरूषांना ठार करत त्यांच्या पत्नींचे सौभाग्य हिरावून घेतलं. अखेर कारवाई करत भारताने पाकिस्तानला ‘सिंदूर’चे मूल्य काय असं ते स्पष्ट भाषेत समजावून सांगितलं आहे. भारताने 9 दहशतवादी तळांवर कारवाई करत सुमारे 100 दहशतवाद्यांना ठार केलं.