शिक्षा होताच माणिकराव कोर्टात, 30 दिवसांची डेडलाईन, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे.  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना, 1995 सालच्या एका प्रकरणात नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)