आपल्या प्रत्येकाचं अल्लड असण्याचे, बागडण्याचे आणि एन्जॉय करण्याचे एक वय असते. मजा, मस्ती करण्यासाठी एखाद्या विशिष्ट वय नसलं तरी एका ठराविक वयात आपण खूप धमाल कर असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वचजण मजा, मस्ती आणि आनंदाच्या शोधात असतात. हा आनंद तुम्हाला कधी, कुठे आणि कसा मिळेल हे काही सांगता येत नाही. आपण अनेकदा बॉईज ट्रीपबद्दल ऐकत असतो. बॉईज ट्रीपमध्ये मुलं खूप मजा करतात, असेही अनेकदा सांगितले जाते. पण तुम्हाला माहितीये का, मुलांप्रमाणे जेव्हा मुलींचा ग्रुप फिरण्यासाठी जातो, तेव्हा त्याही तितकीच धमाल करतात.
सध्या गर्ल्स ट्रीपचे प्रमाण वाढले आहे. साधारण एकाच वयातील किंवा स्वभावाशी मिळत्या जुळत्या असणाऱ्या काही मैत्रिणी भेटतात आणि मग फिरायला जातात. हल्ली तर मुलींचे सोलो ट्रीपला जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. रुटीन आयुष्याचा कंटाळा आला की मुली बॅग उचलतात आणि फिरायला जातात. चार पाच दिवस फिरल्यानंतर त्या पुन्हा परततात. मुली एकट्या असताना काय मजा करत असतील, त्या काय विचार करत असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. अनेकजण याबद्दल विविध अंदाज लावतात. पण आज आम्ही तुम्हाला मुली जेव्हा फिरण्यासाठी एकट्या जातात, तेव्हा काय करतात याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहोत.
मुलगी एकटी ट्रीपसाठी जाते तेव्हा…
मुली या जन्मापासून गंभीर, आदर्शवादी बनण्याचा प्रयत्न करतात, पण एकट्या असताना त्या फोनवर खूप वेळ गप्पा मारतात. चॅटिंग करतात. मनसोक्त टीव्ही पाहतात. विशेष म्हणजे जेव्हा एखादी मुलगी एकटी ट्रीपसाठी जातात तेव्हा ती खूप मज्जा करते. ती दिवसा किंवा रात्री एकटी गाणी गाते. कारण त्यावेळी तिला जज करणारे आजूबाजूला कोणीही नसते. काही मुली तर एकांत, मिळालेली शांतता याचा आनंद घेतात.
एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या मुलींचे ब्रेकअप झाले असेल आणि ती सोलो ट्रीपसाठी गेलेली असेल तर ती मुलगी बाथरुममध्ये जाऊन एकटी रडते. यामुळे ती मोकळी होते. आपल्याला त्रास होत आहे हे दाखवयला नको, म्हणून बहुतांश मुली या बाथरुममध्ये जाऊन रडतात.
आरशासमोर जाऊन प्रश्न विचारतात…
आरसा हा मुलींचा बेस्ट फ्रेंड असतो. प्रत्येक मुलगी आरशासमोर किमान 10 मिनिटे तरी घालवते. काही मुली तर तासनतास आरशासमोर बसतात. मुली स्वतःला न्याहाळण्यात जितक्या परफेक्ट असतात, तितकं दुसरं कोणीही नसते. विशेषत: मुली आरशात स्वतःला प्रत्येक अँगलने पाहून स्वतःलाच अनेक प्रश्न विचारतात. मी घातलेले कपडे चांगले दिसतात का? यावर दुसरा टॉप बरा वाटेल का? टिकली दुसरी लावू का? ज्वेलरीचा दुसरा ऑप्शन ट्राय करु का? असे अनेक प्रश्न ते आरशात उभं राहून विचारतात. विशेष म्हणजे आरशा मुलींचा मित्र असल्याने तोही त्यांना अगदी योग्य ते उत्तर देतो.
सेल्फीद्वारे स्वत:ला जज करतात…
हल्ली प्रत्येकाकडे स्मार्टफोन आले आहे. त्यात सेल्फीचीही सध्या क्रेझ आहे. अनेकदा मुली या स्वत:चे विविध फोटो काढतात. यात बहुतांश सेल्फी असतात. त्यानंतर हे सेल्फी काढून त्या स्वत:ला पाहतात आणि जज करतात.