भारतात एखादा ट्रक अपघात हा फक्त प्रवासातील अडथळा नसतो. हा अपघात एखाद्या ट्रकचालकाचे जीवन उद्ध्वस्त करू शकतो आणि संपूर्ण ट्रान्सपोर्ट व्यवसायाला हादरवू शकतो. रस्त्यावरील अपघातांचे दूरगामी परिणाम लक्षात घेता टाटा मोटर्स आणि TV9 नेटवर्कने अत्यंत एक प्रभावी मोहीम सुरू केली आहे. “Trucking Into The Future – Safer Always”. या मोहिमेचा उद्देश ट्रकचालकांसाठी अधिक सुरक्षित प्रवास घडवणे आणि भारताच्या वाहतूक अर्थव्यवस्थेच्या कणा मजबूत करणे हा आहे.
या देशव्यापी उपक्रमाअंतर्गत चार प्रमुख शहरांमध्ये ‘रोड सेफ्टी समिट्स’ आयोजित केल्या जात आहेत. या ठिकाणी लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील महत्त्वाचे आवाज एकत्र येत आहेत. राज्यातील महत्त्वाचं व्यापारी केंद्र असलेल्या नागपूरमधून या प्रवासाची सुरुवात झाली आहे.
नागपूरमध्ये दमदार सुरुवात
10 एप्रिल 2025 रोजी नागपूरच्या रेडिसन ब्लूमध्ये ही समिट पार पडली. यावेळी विविध प्रादेशिक ट्रान्सपोर्टर, लॉजिस्टिक्स क्षेत्रातील प्रतिनिधी आणि पॉलिसी मेकर्स उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इतनेकर उपस्थित होते. त्यांनी ‘रोड सेफ्टी’ विषयावरील एका प्रेरणादायी ‘फायरसाईड चॅट’मध्ये सहभाग घेतला आणि भारतातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी शासन, उद्योग व चालक यांच्या सामूहिक जबाबदारीवर भर दिला.
Road Safety Summit
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर –
मयंक रैजादा, जनरल मॅनेजर आणि ब्रँड मार्केटिंग प्रमुख (ट्रक्स), टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स
विशाल बर्बुटी, डीलर प्रोप्रायटर, आर्य मोटर्स
संजीव मुलचंदानी, एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड, TV9 नेटवर्क

Road Safety Summit
सुरक्षा संवादाचा गतीने प्रवाह
HCV ट्रक्स बिझनेस, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्सचे मार्केटिंग प्रवण श्रॉफ यांनी या समिटमध्ये एक विशेष सादरीकरण केले. यात त्यांनी टाटा मोटर्सच्या पुढच्या पिढीतील ट्रक्स आणि रोड सेफ्टीसाठी कंपनीची कटिबद्धता यावर प्रकाश टाकला.
यानंतर एक सशक्त पॅनल डिस्कशन झाले. यात ट्रकचालकांना भेडसावणाऱ्या प्रत्यक्ष सुरक्षेच्या अडचणी आणि अपघातांमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होते:
नरेंद्र मिश्रा – ओम रोडलाइन्स
प्रह्लाद अग्रवाल – डायरेक्टर, माय्ल्स ऑफ स्माइल्स लॉजिस्टिक्स
प्रकाश गवळी – अध्यक्ष, महासंघ
आशीष शर्मा – जय बालाजी लॉजिस्टिक्स
ही चर्चा टीव्ही9 नेटवर्कचे अँकर करुणा शंकर शर्मा यांनी प्रभावीपणे हाताळली. तर ट्रान्सटॉपिक्सचे मालक गिरीश मिरचंदानी यांनी सह-संवादकाची भूमिका बजावली.

Road Safety Summit
रोड सेफ्टीसाठी असलेल्या कटिबद्धतेला सन्मान
या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक ट्रान्सपोर्टर्सना त्यांच्या व्यवसायात राबवलेल्या उत्तम सेफ्टी प्रोटोकॉलसाठी गौरविण्यात आले. त्यांचा पुढाकार अधिक सुरक्षित रस्ते आणि विश्वासार्ह लॉजिस्टिक साखळी निर्माण करण्यात मदत करत आहे.
पुढे काय?
नागपूरने या मोहिमेची दमदार सुरुवात करून दिली आहे. “Trucking Into The Future – Safer Always” ही मोहीम आता इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये पोहोचणार आहे, जिथे सेफ्टीवर चर्चा आणि सेफ्टी चॅम्पियन्सचा सन्मान केला जाईल.
टाटा मोटर्स आणि TV9 नेटवर्क हे केवळ रोड सेफ्टीबद्दल बोलत नाहीत, तर भारताचे आर्थिक स्थैर्य, पारदर्शकता आणि सामूहिक जबाबदारी यांचा एक दृढ पाया घडवतात. कारण प्रत्येक मैल महत्त्वाचा आहे — आणि प्रत्येक जीवन त्याहून अधिक आहे.