सगळीकडे सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामूळे प्रत्येक महिलेला कोणत्या न कोणत्या लग्नसोहळ्याला जावे लागते. तसेच इतर अनेक कार्यक्रम असतात त्यासाठी मेकअप करणे कोणतीच महिला टाळत नाही. मेकअपमुळे चेहऱ्याचे वैशिष्ट्यही वाढते. कारण मेकअप तुम्हाला सुंदर बनवण्यासोबतच तुम्हाला आत्मविश्वास देखील मिळतो. मेकअपमध्ये अनेक प्रकारचे प्रॉडक्ट वापरले जातात. जसे गाल गुलाबी करण्यासाठी ब्लशचा वापर केला जातो, तसेच डोळे सुंदर करण्यासाठी काजल आणि आयलाइनरचा वापर केला जातो, तसेच चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी फाउंडेशन आणि बेसचा वापर केला जातो. त्यासोबतच चेहऱ्याला आकार देण्यासाठी म्हणजेच फेस कट्स आणि पॉइंट्सवर भर देण्यासाठी ब्रॉन्झर आणि कॉन्टूर यांचा वापर केला जातो. त्यांचा रंग गडद तपकिरी असतो, जो चेहऱ्यावर लावल्यावर कपाळ, गाल, नाक यांना आकार मिळतो.
मेकअप करताना मात्र काही सामान्य महिलांना ब्रॉन्झर आणि कॉन्टूरमधील नेमका फरक माहित नसतो. जरी दोघांचेही काम जवळजवळ सारखेच असते. अशा वेळेस मेकअप करताना महिलांनी ब्रॉन्झर आणि कॉन्टूर यापैकी काय निवडावे हा प्रश्न पडतो. तर आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत की ब्रॉन्झर आणि कॉन्टूरमध्ये काय फरक आहे? चेहऱ्याच्या आकारासाठी कोणते चांगले काम करते.
ब्रॉन्झर म्हणजे काय?
ब्रॉन्झर हे एक मेकअप प्रॉडक्ट आहे जे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक उबदारपणा निर्माण करण्यास मदत करते. ब्रॉन्झर हे तपकिरी रंगाचे पावडर स्वरूपातील प्रॉडक्ट असते. महिला मेकअप करताना चेहरा टोन करण्यासाठी याचा वापर करतात. ब्रॉन्झर थोडे चमकदार असल्याने यांचा वापर जास्त करून गाल, नाक आणि हनुवटीवर लावतात जेणेकरून तुम्हाला योग्य फेस कट मिळतो. तसेच याच्या वापराने चेहऱ्याचे हे भाग देखील ठळक दिसतात.
कॉन्टूर म्हणजे काय?
मेकअपमध्ये कॉन्टूर हे सर्वात जास्त वापरले जाणारे उत्पादन आहे. हे क्रीम आणि पावडर दोन्ही स्वरूपात येते. त्याचे काम चेहऱ्याच्या काही भागांना आकार देणे आहे. कॉन्टूर लावल्याने नाक, हनुवटीचा भाग आणि गाल हायलाइट होतात. ज्यामुळे चेहऱ्याला योग्य फेस कट मिळतो. आणि मेकअप उठावदार दिसतो.
आकार देण्यासाठी कोण चांगले आहे?
जर तुम्हाला तुमचा चेहरा बारीक आणि शार्प दिसावा असे वाटत असेल तर तुमच्यासाठी कंटूर हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याच वेळी, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचे काही भाग हायलाइट करायचे असतील तर तुम्ही ब्रॉन्झर वापरू शकता. जर तुम्हाला तुमचा चेहरा शार्प दिसावा असे वाटल्यास किंवा काही भाग हायलाइट करायचा असेल तर तुम्ही दोन्ही वापरू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)