Western Maharashtra 12 Seats : पश्चिम महाराष्ट्रातील १२ मतदारसंघाचा निकाल एकाच ठिकाणी पाहा लाइव्ह

Western Maharashtra 12 Seats Full Result, पुणे : महाराष्ट्रातील ४८ मतदार संघापैकी पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण १२ जागांसाठी निवडणूक झाली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार प्रचार झाला आणि त्यात खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत वाढली. या १२ मतदार संघात ६ ठिकाणी भाजप यांनी आपले उमेदवार उतरविले. तर ४ ठिकाणी उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ४ ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. तीन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार तुल्यबळ लढत देत आहेत. तर ४ ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपली ताकद लावली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने २ ठिकाणी आपले उमेदवार दिलेत. तर काँग्रेसकडून बंडखोर म्हणून विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. १२ मतदार संघात काय निकाल लागतो हे महाराष्ट्रात औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे तुमच्याकडे

पश्चिम महाराष्ट्र (१२)

सांगलीत महाविकास आघाडीत जुंपली

सांगलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात घटक पक्षातील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जुंपली. सांगलीची जागा दोघांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यात उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळविण्यात यश प्राप्त केले, परंतु विशाल पाटील यांना थोपविण्यात काँग्रेसला यश आले नाही. पाकीट चिन्हावर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून एकूणच रंगत आणली. त्यामुळे ही जागा कोणला जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

साताऱ्यात उदयनराजे पुन्हा रिंगणात

साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयराजे यांनी केल्या लोकसभेत राजीनामा दिला आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. त्यांना त्यांना भाजपने राज्यसभेचे खासदार केले.पण आता पुन्हा एकदा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांच्यासमोर दंड थोपटून उभे आहेत.

महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदार संघाचा निकाल एकाच ठिकाणी