Weather update : महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार; तर या भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार, जाणून घ्या हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. उष्णता चांगलीच जाणवत आहे. तर दुसरीकडे विदर्भात पात्र पावसाचं वातावरण आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. वातावरणातील या बदलाबाबत हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सानप?  

विदर्भात काही ठिकाणी थंडसथॉमचा पाऊस पडला आहे. विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे वारे, हे वारे उत्तर ते दक्षिण असे असून, त्यामुळे आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमान आहे, कारण या भागांमध्ये आद्रता कमी आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तापमानात वाढ तर काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात पुढे काही दिवस काय परिस्थिती असणार याबाबत सानप म्हणाले की येणाऱ्या चार ते पाच दिवसांसाठी विदर्भात थंडसथॉम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात चार तारखेपासून ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे सध्या जो प्रचंड उकडा जाणवत आहे, तो कमी होईल, असं सानप यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमान कायम असणार आहे. मात्र त्यानंतर तापमानात घट होईल. थंडसथॉमचा पाऊस हा आपल्याला दरवर्षी मार्च- एप्रिल महिन्यात होताना पाहायला मिळतो. उन्हाळ्यात फक्त उन असते अशी परिस्थिती नसते. अनेक वेळा उष्णतेच्या वाऱ्यांसह थंडसथॉमसह सोसायट्याचा वारा आपल्याला पाहायला मिळतो असंही सानप यांनी म्हटलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १ मे ते ६ मे दरम्यान, कोकण आणि  गोवा विभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर ४ मे नंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्याची देखील शक्यता असल्याचा अंदाज यावेळी सानप यांनी वर्तवला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)