पुणे: राज्यात सध्या उन-पावसाचा खेळ सुरु आहे. कुठे अंगाची लाहीलाही करणारं उन्ह तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतो आहे. त्यात आता राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. तर, कोकण, ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर येथे उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस उत्तर कोकण, दक्षिण मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ वगळता इतर राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इतर ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रति वेगाने वाऱ्यासह पाऊस पडणार असा अंदाज आहे.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.