जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही शिव, शाहू, फुले- आंबेडकरांचा विचार सोडणार नाही, अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले

राजकारणात प्रत्येकाचे मतप्रवाह वेगळे असू शकतात परंतू त्या आड मैत्री आणि नात्यात दुरावा कधी होत नव्हत आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी देखील अनेक मतभेद असताना राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन काम केल आहे. आम्हीही त्यांचे वारसदार असून या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही शिव,शाहू,फुले आणि आंबेडकर यांचा विचार सोडणार नाही असे स्पष्ट प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.६५ वर्षांचा इतिहास आम्ही या कार्यक्रमात मांडला आहे. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही हा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम दरवर्षी घेत जाणार आहोत आणि यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बेळगाव,कारवार सह निपाणी हा मराठी बहुल भाग महाराष्ट्रात अजून आलेला नाही. त्यामुळे जेव्हा तो प्रदेश आपल्यासोबत येणार तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा होणार असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

चायना आणि जपान त्यांच्या बुलेट ट्रेनमुळे पुढे गेले

आजचे युग एआयचे युग आहे. आज भावे साहेबांनी इथे बोलत असताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या राज्याला अनेक मुख्यमंत्री लाभले आहेत. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या ३५ कोटी होती. आता देशभराची लोकसंख्या १४० कोटी आहे. याचा विचार झाला पाहिजे असे अजितदादा यावेळी म्हणाले. विरोधक बुलेट ट्रेन नको आणि बाकी काम करा अशी टीका करीत आहेत. परंतू चायना आणि जपान हे त्यांच्या बुलेट ट्रेनमुळे पुढे गेले आहेत. तेथे जे बदल झाले आहेत ते आपण मान्य केल पाहिजे असेही अजितदादा यांनी यावेळी म्हटले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)