Walking Benefits : दिवसभरात किती वेळ चालणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला…

दिवसभरात किती वेळ चालणे आरोग्यासाठी फायदेशीर?

निरोगी आरोग्यासाठी योग्य पोषक आहार आणि शरीराला व्यायामाची सवय असणे गरजेचे असते. तुमच्या आराहामध्ये पोषक आहाराचे समावेश केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार होत नाहीत. आहारासह योग्य व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होते. अनेकांना सकाळी उठल्यावर किंवा रात्री जेवल्यानंतर चालण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञांनुसार, दिवसभरामध्ये तुम्ही 40 ते 45 मिनिटे चालल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. चालल्यामुळे फक्त तुमचे वजन कमी होत नाही तर तुमच्या शरीरातील अनेक स्नायूंची क्रिया होते.

चालल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्योसबतच जेवल्यानंतर 20 मिनिटे चालल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरेग्या निरोगी राहाण्यास मदत होते. अनेकांना प्रश्न पडला असेल की दिवसभरामध्ये नेमकं किती वेळ चालणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया दिवसभरामध्ये नेमकं किती वेळ चालणे फायदेशीर असते त्यासोबतच चालण्याचे तुमच्या आरोग्याला नेमकं काय फायदे होतात.

दिवसभरात किती चालले पाहिजे?

तज्ञांच्या मते, दररोज सकाळी 8 ते 10 किलोमीटर चालल्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आव्हालानुसार, तुम्ही आठवड्यातून किमान 150 मिनिटे म्हणजेच दररोज सुमारे 30 मिनिटे चालल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुम्ही दररोज र 8 ते 10 किलोमीटर चालल्यामुळे तुमचे वजन तर कमी होतेच त्यासोबतच तुमच्या शरीरातील चयापचय मजबूत होण्यास मदत होते. चालल्यामुळे तुम्हाला जर गढगे दुखीच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

कोणत्या वयात किती चालावे?

रिपोर्ट्सनुसार, 6 ते 17 वर्षाच्या मुलांनी दररोज किमान 60 मिनिटे चालणे किंवा मैदानी खेळ खेळणे अपेक्षित असते. त्यासोबतच दिवसभरामध्ये 15000 पावले लहान मुलांसाठी फायदेशीर ठेरते. 18 ते 40 वर्षाच्या व्यक्तींनी दिवसभरामध्ये किमान 12000 पावले चालणे अपेक्षित असते. तर 40 ते 60 वर्षांच्या लोकांनी दिवसभरात 4000-500 पावले चालणे फायदेशीर ठरेल. सुरूवातीला तुम्ही दिवसभरामध्ये 20 ते 30 मिनिटे म्हणजेच 2 ते 4 किलोमीटर चालणे अपेक्षित असते.

चालण्याचे आरोग्यदायी फायदे :

चालण्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. दररोज सकाळी लवकर उठून चालल्यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांची हालचाल होते त्यासोबतच तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुम्हाला जर अॅसिडिटीचा त्रास असेल तर सकाळी जिऱ्याचे पाणी पिऊन किमान २० मिनिटे चालल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात. चालल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहाते त्यासोबतच तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी चालल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते त्योसोबतच वजन कमी होण्यास मदत होते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)