प्रवाशांची वाट पहात होता, कारच्या भीषण धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू, नवी मुंबई हादरली

नवी मुंबईमध्ये एका कारने दोन रिक्षांना जबर धडक दिल्याची भयानक दुर्घटना घडली आहे. यामध्ये रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना एका कारने जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आणि घनश्याम यादव हा रिक्षाचलक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. घनश्याम याने अखेरचा श्वास घेतला, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारचालकाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्टेशनबाहेर ही दुर्घटना घडली. सायन पनवेल मार्गावर हा अपघात झाला. तेथे रस्त्याच्या कडेला काही रिक्षा उभ्या होत्या. त्यापैकी एका रिक्षामध्ये रिक्षाचालक घनश्याम यादव हा बसला होता. कोणी प्रवासी येतात का, भाडं मिळतं का, याची ते वाट पहात होते. मात्र तेवढ्यात अनर्थ झाला. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने घनश्याम यांच्या रिक्षासह आणखी एका रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षाचा चक्काचूर झाला, ती मागून अक्षरश: चेपली गेली. या घटनेत घनश्याम यादव हे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताप्रकरणी नेरुळ पोलिसांनी आरोपी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. नेरुळ पोलिस या दुर्घटनेसंदर्भात आणखी तपास करत आहेत.

ही बातमी अपडेट होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)