पतंगराव कदमांच्या लेकीचं निधन, ताईच्या विरहात विश्वजीत कदम भाववश, गोड फोटो शेअर करत म्हणाले…

Patangrao Kadam Daughter Death : पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे

(फोटो)

सांगली : महाराष्ट्राचे माजी वनमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्येचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. भारतीताई महेंद्र लाड यांच्या अकाली मृत्यूने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पतंगरावांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

भारती विद्यापिठाचे नामकरण

पतंगराव कदम यांनी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. लाडकी कन्या ‘भारती’ यांच्या नावावरुन पतंगरावांनी या विद्यापिठाचे नामकरण केले होते. भारती लाड या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी होत.
Santosh Bangar : पाकिस्तानी दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांनाही गोळ्या घाला, शिवसेना आमदार संतोष बांगर आक्रमक

विश्वजीत कदम यांची पोस्ट

पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा भावना विश्वजीत कदम यांनी ताईसोबत अत्यंत गोड फोटो शेअर करत व्यक्त केल्या आहेत.

Bharati Lad : पतंगराव कदमांच्या लेकीचं निधन, भारती ताईच्या विरहात विश्वजीत कदम भाववश, गोड फोटो शेअर करत म्हणाले…

पतंगराव कदमांच्या कुटुंबावर शोककळा

पतंगराव कदम यांचे 9 मार्च 2018 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारानंतर अवयव निकामी झाल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. पतंगराव कदम यांना चार लेकरं होती. यापैकी अभिजीत कदम यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. तर आता भारती लाड यांनीही अखेरचा श्वास घेतला. भारती यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम, बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे. त्यांचे पती महेंद्र लाड हे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभवआणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)