मग पुढे झाले काय?Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क-व्हिडिओ
काल नाशिक पोलिसांना एका आरोपीने चांगलाच चमत्कार दाखवला. प्राणघातक हल्ला प्रकरणात भ्रदकाली पोलिसांनी क्रिश शिंदे या आरोपीला अटक केली होती. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला पोलीस ठाण्यात आणत असताना त्याने पोलिसांच्या हाताला झटका दिला. पोलिसांच्या हाताला हिसका देत त्याने हवेत सूर मारला. त्याचा मित्र त्यासाठी स्कूटी घेऊन आला होता. त्या स्कुटीवर उडी घेत त्याने धूम ठोकली. यासंबंधीचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर एकदम व्हायरल झाले. त्याचा सूर आणि धूम ठोकण्याचे टायमिंग याची चर्चा झाली. पण पुढे झाले काय?
समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल
आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका दिल्यानंतर याविषयीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगला व्हायरल झाला. यात एक स्कुटी उभी दिसते. स्कुटीवरील तरूण मागे पाहतो. तर एक तरुण धावत येत स्कुटीवर उडी घेतो. तशीच दोघे स्कुटी दामटतात. त्यांच्या मागे पोलीस धावतात. त्यातील एक रस्त्यावर धपकन पडतो. तर एक पोलीस दुचाकी घेऊन जाताना दिसतो. या घटनेने भद्रकाली पोलिसांची चांगलीच भांबेरी उडालेली दिसते.
सिने स्टाईल पाठलाग, मग मुसक्या आवळल्या
क्रिश शिंदे हा याच्यावर गंभीर गुन्हा असताना त्याने जो प्रताप केला. त्यामुळे पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभं ठाकले होते. पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला. त्याचे धागेदोरे, त्याचे मित्र सर्वांकडे चौकशी सुरू केली. पोलिसांच्या तावडीतून तो पळाल्याने त्याला पकडणे आवश्यक होते. 12 तासांच्या सिनेस्टाईल पाठलागानंतर त्याला पोलिसांनी कसारा घाटातील जंगलात हुडकून काढले. त्याला ताब्यात घेतले.
पोलिस उपनिरीक्षक निलंबित
तर जळगावातील ड्रग्स प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना निलंबित करण्यात आले आहे. ड्ग्स प्रकरणात फरार असलेल्या म्होरक्या अबरार कुरेशी या संशयिताशी २५२ वेळा संपर्क केल्याच्या कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोटे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. आता निलंबन काळात या प्रकरणाची चौकशी भुसावळच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडून केली जाणार आहे.