म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : वाढत्या उन्हामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसू लागल्या आहेत. याचा परिणाम शेतमालांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होऊ लागल्याने भाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी, भाज्यांचे दर दुपटीने वाढले असून जून-जुलैपर्यंत ही दरवाढ कायम राहणार आहे.मुंबईत भाज्यांची मागणी पूर्ववत होऊ लागली असताना आवक मंदावली आहे. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून त्यामुळे मुंबईतील आवक कमी झाली आहे. बाजारात सध्या ६० ते ७० टक्केच भाजीपाला येत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. घाऊक बाजारात भाज्या ६० ते ७० रुपये किलोवर पोहोचल्या. किरकोळ बाजारातही त्यांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. किरकोळ बाजारात आता प्रत्येक भाजी ८० ते १०० रुपये किलोच्या घरात पोहोचली आहे.
फळभाज्यांसह पालेभाज्यांवरही दरवाढीचा परिणाम दिसू लागला आहे. किरकोळ बाजारात २० रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची एक जुडी ४० ते ५० रुपये झाली आहे. टोमॅटोही ४० रुपये किलोवरून ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. मटारचे दर १०० ते ११० रुपये किलो झाले आहेत. हिरवी मिरचीही घाऊक बाजारातच ८० ते ९० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीला एक किलोसाठी १२० रुपये मोजावे लागत आहेत.

भाज्यांचे दर घाऊक बाजारात (रुपये किलो)
भेंडी ४० ते ५०
भोपळा ४० ते ५०
फ्लॉवर १८ ते २०
घेवडा ६० ते ८०
कारली ४० ते ५०
ढोबळी मिरची ४० ते ५०
सुरण ५० ते ६०
तोंडली ४० ते ५०
मटार १०० ते ११०
वालवड ७० ते ८०