Sangli Crime News- सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पतीला संपवले आणि पोलिसांना शरण गेला आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या केली गेली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत अनिता काटकर या त्यांचे पती संशयित सीताराम काटकर यांच्यासोबत शिंदे मळा परिसरात असलेल्या कुरणे गल्ली मध्ये राहतात. दोघेही पती-पत्नी भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. काटकर पती पत्नी मध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. आज शुक्रवारी पहाटे पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास अनिता काटकर या त्यांच्या घरातील खोलीत झोपलेल्या होत्या. यावेळी संशयित पती सीताराम काटकर याने कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात अनिता काटकर यांचा जागीच मृत्यू झाला.
संशयित पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला
खुनाच्या घटनेनंतर संशयित पती स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्यासह पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, खून करणाऱ्या संशयित पती सीताराम काटकर याला पोलिसांनी अटक केली असून कौटुंबिक वादातून निर्घृण पणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.