Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार कोणत्या दिशेला बसून जेवणे फायदेशीर, जाणून घ्या….

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर देखील खोलवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही जर चुकिच्या दिशेला बसून जेवण केल्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्या संबंधित समस्या होऊ शकतात. आपल्या शरीरासाठी जेवण जेवढे महत्त्वाचे असते त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते आपण योग्य ठिकाणी बसून जेवण करतोय की नाही. शास्त्रामध्ये जेवायला बसताना कोणत्या ठिकाणी बसावे त्या बाबत देखील सांगितले आहे.

वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही जेवायला नेमकं कुठे बसले पाहिजेल याबाबत सांगितले आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती, यश आणि शुभ परिणाम हवे असतील तर जेवताना योग्य दिशेला बसून जेवणे गरजेचे असते. जेवताना योग्य दिशेला बसून जेवल्यामुळे तुमच्या आयुष्यावर खुप सकारात्मक परिणाम होऊ शकतात. वास्तुशास्रानुसार, प्रत्येक दिशेने वेगवेगळ्या प्रकारची उर्जा असते. जर आपण योग्य दिशेला बसून जेवल्यामुळे तिथे असलेली उर्जा आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.

पूर्व दिशा –

पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यास मेंदू तीक्ष्ण होतो, पचनसंस्था मजबूत राहते आणि मानसिक ताणही कमी होतो. यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते. ही दिशा वृद्ध आणि आजारी लोकांसाठी सर्वात फायदेशीर मानली जाते. ज्या लोकांना पोटाच्या समस्या वारंवार येतात त्यांनी पूर्व दिशेला बसून जेवण करावे.

पश्चिम दिशा –

पश्चिम दिशेला नफ्याची दिशा म्हणतात. या दिशेला बसून जेवल्याने प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. वास्तुशास्त्रानुसार, व्यवसाय, नोकरी, लेखन, संशोधन आणि शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी ही दिशा खूप शुभ मानली जाते. यामुळे व्यवसायात नफा होतो आणि घरात संपत्ती आणि समृद्धी वाढते.

उत्तर दिशा –

उत्तर दिशा ही संपत्ती आणि ज्ञानाची दिशा मानली जाते. या दिशेला बसून जेवल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि यश मिळते. विशेषतः तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी उत्तर दिशेला बसून जेवण करावे.

या दिशेला बसून जेवू नका…

वास्तुशास्त्रानुसार, ही दिशा सर्वात अशुभ मानली जाते. दक्षिण दिशा ही यमराजाची (मृत्यूची देवता) दिशा आहे, म्हणून या दिशेने बसून अन्न खाल्ल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडतो आणि घरात गरिबी येते. कुटुंबात वाद वाढतात आणि त्यांच्या प्रगतीतही अडथळे येऊ लागतात. विशेषतः ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी या दिशेला बसून अन्न खाणे टाळावे.

जेवणाच्या खोलीची योग्य दिशा….

वास्तुशास्त्रानुसार, घरातील जेवणाचे खोली नेहमी पश्चिम दिशेला असावी. ही दिशा शुभ मानली जाते आणि या दिशेला बसून अन्न खाल्ल्याने घरात सुख-समृद्धी राहते, आरोग्य चांगले राहते आणि अन्न आणि पैशाची कधीही कमतरता भासत नाही.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)