हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते आणि आनंद आणि समृद्धी येते. तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानली जाते. तुळशीची पूजा केल्यामुळे तुमच्यावर भगवान विष्णूचे आशिर्वाद मिळू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुळशीभोवती काही गोष्टी ठेवणे टाळावे? वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. वास्तू प्रमाणे तुळशीच्या रोपाजवळ या गोष्टी ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तूदोष निर्माण होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया तुळशीजवळ कोणत्या पाच गोष्टी ठेवणे टाळावे?
कचराकुंडी : – तुळशीजवळ कचराकुंडी ठेवणे सर्वात अशुभ मानले जाते. तुळशीला स्वच्छ आणि नीटनेटके वातावरण आवडते आणि तिथे कचराकुंडी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे घरात दारिद्र्य येते आणि धनहानी होते.
बूट आणि चप्पल :- तुळशीजवळ बूट आणि चप्पल ठेवणे अशुभ मानले जाते. बूट आणि चप्पल अशुद्ध मानले जातात आणि ते तुळशीजवळ ठेवल्याने तुळशीची पवित्रता कमी होते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि आर्थिक चणचण वाढू शकते.
काटेरी झाडे :- कॅक्टस इत्यादी काटेरी झाडे तुळशीभोवती ठेवू नयेत. काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे घरात अशांतता आणि तणावाचे वातावरण निर्माण होते. यामुळे संपत्ती आणि समृद्धी देखील बाधा येते.
शिवलिंग :- तुळशीजवळ शिवलिंग ठेवण्यासही मनाई आहे. तुळशी आणि शिवलिंग दोन्ही पवित्र आणि पूजनीय आहेत पण ते एकत्र ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशाचे नुकसान होते आणि तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
मांस आणि मद्य :- तुळशीभोवती मांस आणि मद्य सेवन करू नये. तुळशीला शुद्ध आणि पवित्र वातावरण आवडते आणि मांस आणि मद्य सेवन केल्याने तुळशीची पवित्रता कमी होते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा :
- तुळशीभोवती नेहमीच स्वच्छता ठेवा.
- तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि तिची पूजा करा.
- तुळशीभोवती फुले, दिवे इत्यादी सकारात्मक उर्जेला चालना देणाऱ्या वस्तू ठेवा.
- घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा.