पुणे अत्याचार प्रकरणातील तरुणीचा वसंत मोरेंना फोन, म्हणाले ती रडून-रडून..

गेल्या आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात धक्कादायक घटना घडली होती, बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला, या घटनेनं खळबळ उडाली असून वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन सुरक्षा रक्षकांचं कार्यालय फोडलं होतं. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले होते. दरम्यान या प्रकरणातील पीडितेनं आता वसंत मोरे यांना फोन केला आहे.

नेमकं काय म्हणाले वसंत मोरे? 

मला संबंधित तरुणीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला होता, प्रत्येक अधिकाऱ्याला ती रडून सांगत आहे. आरोपी सुखात आत जाऊन बसला आहे, पीडित तरुणीला मात्र बसवून ठेवले जात आहे. 7500 रुपये दिले तर पीडित मुलीची बॅग पोलीस ठाण्यातच होती, मग तेव्हा का नाही तपासणी करण्यात आली? असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. आज आम्ही मनाई आदेश घालावा, म्हणून न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. मला आत्महत्या करावीशी वाटत आहे, असं पीडित तरुणी म्हणत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

दरम्यान दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यांच्या भावाकडून देखील मोठा दावा करण्यात आला आहे. हे प्रकरण घडलं त्यानंतर दत्ता पोलिसांना सापडला नाही, त्यामुळे सगळ्या माध्यमांनी बातम्या चालवल्या की तो फरार झाला. त्यामुळे आता गावकऱ्यांना देखील दत्ता हाच आरोपी असल्याचं वाटत आहे, गावात आम्हाला हिन वागणूक मिळत आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. पीडितेला पण न्याय मिळाला पाहिजे, आणि जर दत्ता दोषी असेल तर त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे, मात्र मीडियानं या प्रकरणातील दुसरी बाजू देखील दाखवावी असं आरोपीच्या भावानं म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या आठवड्यात मंगळवारी पाहाटेच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी त्याच्या गावातून अटक केली, न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)