Vasant More : वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश, पण उद्धव ठाकरेंनी ‘त्या’ विषयावर बोलणे टाळले

मुंबई : मनसेचे नेते म्हणून नावा रुपास आलेले वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज पक्षप्रवेश केला. मातोश्रीवर आज वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला याठिकाणी वसंत मोरे यांच्यासह शेकडो पदधिकाऱ्याने ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश केला आहे. पुण्यातून शेकडो गाड्याचा ताफा घेवून वसंत मोरे मुंबईकडे सकाळी रवाना झाले होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितकडून वसंत मोरे यांनी निवडणुक लढवली होती ज्याचा फटका महाविकास आघाडीला बसला होता आज पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी वसंत मोरे यांच्या लोकसभेबाबत निर्णयावर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असे म्हणत बोलणे टाळले पण आगामी काळात वसंत मोरेंमुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नाराज होणार का हे पाहणे महत्त्वाचे असेल

उद्धव ठाकरे काय म्हणाले

“मला एका गोष्टीचे समाधान की तु्म्ही पहिला शिवसैनिक होतात आणि सेनेत काय मान सन्मान मिळतो याची तु्म्हाला जाणीव आहे म्हणून तुम्ही परत स्वगृही परतला. काही जण मला म्हणाले शिवबंधन बांधताना की आम्ही पूर्वी शिवसेनेत होतो मग मी तुम्हाला आता एक शिक्षा देतो की पुर्वी पेक्षा कित्येकपटीने शिवसेनेची ताकद पुण्यात वाढवा” असा उद्धव ठाकरेंनी नव्याने दाखल झालेल्या वसंत मोरे आणि पुण्यातील नेत्यांना आदेश दिला. जबाबदारी म्हणून शिवसेना पुण्यात वाढवा, महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली, गद्दारी आणि धोकेबाजीच्या विरोधात आता विधानसभेची निवडणुक असेल, पुणे हा सत्ताबदलाचा केंद्रबिंदु बनला पाहिजे असे ठाकरे म्हणाले

वसंत मोरे काय म्हणाले

“१९९२ ला मी सेनाचा शाखाप्रमुख झालो होतो वयाच्या ३१ व्या वर्षापर्यंत मी सेनेसोबत होतो नंतर मी मनसेत गेलो आता मी पुन्हा ठाकरेंसोबत सेनेत पक्षप्रवेश करतोय, पुणे शहरात १५ वर्ष नगरसेवक असल्याने मला प्रशासनाचा चांगला अनुभव आहे, माझी पुन्हा एकदा घरवापसी होते उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊतांच्या आदेशाने आम्ही पक्षासाठी एकनिष्ठेने काम करु” असे वसंत मोरे म्हणाले, तसेच पुण्यात पुन्हा शिवसेनेला पुर्वीसारखी ताकद मिळवून देवू एकत्र मिळून काम करु असा वसंत मोरेंनी विश्वास व्यक्त केला